![]()
पाचोरा – मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या टीव्ही 9 मराठी या चॅनलने आता आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून, येत्या १ एप्रिल २०२५ पासून हा चॅनल डीडी फ्री डिश या मोफत डीटीएच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता टीव्ही 9 मराठी चॅनल डीडी फ्री डिशवरील चॅनल क्रमांक ६८ वर मोफत पाहता येणार आहे. हा बदल मराठी प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंददायक ठरणार असून, ग्रामीण भागातील लाखो प्रेक्षकांसाठी टीव्ही 9 मराठीच्या बातम्या, विशेष कार्यक्रम, चर्चा सत्रे आणि मनोरंजनाचे विविध पैलू पाहणे अधिक सुलभ होणार आहे. डीडी फ्री डिश हा भारत सरकारचा उपक्रम असून, ग्रामीण व निमशहरी भागातील नागरिकांसाठी मोफत डिजिटल टीव्ही सेवा पुरवण्याचा उद्देश आहे.टीव्ही 9 मराठी आता कोणत्याही मासिक शुल्काशिवाय मोफत उपलब्ध होत असल्यामुळे हा चॅनल सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचू शकणार आहे. विशेषतः जेथे केबल किंवा इतर डीटीएच सेवा उपलब्ध नाहीत, अशा दुर्गम भागांतील लोकांसाठी ही सेवा वरदान ठरणार आहे. यामुळे मराठी संस्कृती, प्रादेशिक घडामोडी व समाजाभिमुख पत्रकारिता अधिक व्यापक पातळीवर पोहोचणार आहे. टीव्ही 9 मराठीने गेल्या काही वर्षांत वास्तववादी बातम्यांमुळे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर थेट भाष्य करणाऱ्या कार्यक्रमांमुळे आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. आता डीडी फ्री डिशवर उपलब्ध झाल्याने या चॅनलची व्याप्ती अधिकच वाढणार आहे. विशेषतः शेतकरी, ग्रामीण जनतेसाठी आणि मराठी माणसासाठी ही एक नवी व सुवर्णसंधी आहे. डीडी फ्री डिश ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत प्रसारभारती संस्थेची मोफत डीटीएच सेवा असून, यामध्ये कोणतेही मासिक शुल्क लागत नाही. एकदाच सेट-टॉप बॉक्स विकत घेतल्यावर १०० हून अधिक चॅनेल मोफत पाहता येतात. डीडी फ्री डिश सेट-टॉप बॉक्स आपल्या टीव्हीला जोडून चॅनल स्कॅन केल्यानंतर टीव्ही 9 मराठी चॅनल क्रमांक ६८ वर सहज पाहता येईल.मुलाखती, थेट प्रक्षेपण, सामाजिक घडामोडी, राजकीय विश्लेषण, आणि जनसामान्यांशी निगडित माहिती देणारा टीव्ही 9 मराठी आता अधिक जवळ येणार आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून टीव्ही 9 मराठी आपल्या घरात आणायला विसरू नका — डीडी फ्री डिशवर, चॅनल क्रमांक ६८
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






