टायरहाऊसचे पाचोऱ्यात भव्य उद्घाटन – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महापूजेसह शुभारंभ

0

पाचोरा  –  शहरात आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट दर्जाची सेवा देणारे “टायरहाऊस” हे नवे व्यावसायिक केंद्र आपल्या सेवेत सुरू होत आहे. दि. ३० मार्च २०२५, रविवार रोजी गुढीपाडव्याच्या मंगलमुहूर्तावर या दुकानाचा शुभारंभ उत्साहपूर्ण आणि धार्मिक वातावरणात होणार आहे. या विशेष दिवशी || श्रीसत्यनारायणाचीमहापूजा || आयोजित करण्यात आली असून, या शुभप्रसंगी आप्तेष्ट, हितमित्र आणि पाचोरा शहरातील नागरिकांनी उपस्थित राहून नव्या व्यवसायास आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. टायरहाऊस हे पाचोरा शहरातील वाहनचालकांसाठी एक विश्वासार्ह आणि आधुनिक सेवा देणारे केंद्र ठरणार आहे. येथे सर्व प्रकारच्या चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी दर्जेदार टायर, व्हील अलायमेंट, बॅलन्सिंग आणि तत्सम सेवा पुरविल्या जाणार आहेत. वाहनांची सुरक्षितता, टिकावपणा आणि ग्राहकांचा वेळ व पैसा यांचा विचार करून, हे केंद्र एक विश्वासाचे ठिकाण ठरणार आहे. शुभारंभाचे ठिकाण: समर्थपेट्रोलपंपाच्या शेजारी, नवगजापुलाजवळ, पाचोरा. महापूजा व तिर्थप्रसाद वेळ: सायंकाळी ५ वाजल्यापासून आपल्या आगमनापर्यंत. या उपक्रमामागे प्रेरणादायी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वांचा सहभाग असून, त्यात पुढील मान्यवरांचा समावेश आहे – श्री.लालचंद्रामपालगौड (सेवानिवृत्त व्यवस्थापक, दिपाचोरापिपल्सबँक), श्री.राजेंद्ररामसिंगपाटील (सेवानिवृत्त उपमुख्याधिकारी, पाचोरानगरपरिषद), श्री.आशिषगौड, श्री.प्रशांतगौड, श्री.मोहितराजपूत – हे तरुण, धडपडे आणि सेवाभावी उद्योजक नव्या व्यवसायाच्या यशासाठी कटिबद्ध आहेत. या उपक्रमाला पाचोऱ्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, तसेच “टायरहाऊस” या नावाला शहरात विश्वासाचा मान मिळावा, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. या मंगलप्रसंगी आपल्या सहपरिवार व मित्रपरिवारासह उपस्थित राहून नवीन व्यवसायास शुभेच्छा व आशिर्वाद द्यावेत अशी अपेक्षा गौड आणि राजपूत परिवाराच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here