रस्त्यावर साजरा झालेला प्रशांत येवले यांचा विश्वासाचा वाढदिवस

0

पाचोरा – लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेत आज अनेक तडजोडी झालेल्या दिसतात. मात्र अशा काळातही काही पत्रकार अशा तत्त्वांवर ठाम राहतात, जे केवळ लोकहितासाठीच कार्यरत असतात. ‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी प्रशांत येवले हे त्यापैकीच एक नाव. त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वखर्चाने भारुडभर्ती संबंधित पत्रकारांचे फोटो बॅनरवर न घेता पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अत्यंत साधेपणाने आणि सर्वसामान्य लोकांच्या सान्निध्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. कोणताही डीजे, बॅनरबाजी किंवा मोठा खर्च न करता, केवळ स्नेह, आपुलकी आणि खऱ्या संबंधांच्या आधारे साजरा झालेला हा वाढदिवस खरंतर एका आदर्श पत्रकाराच्या जीवनमूल्यांचा उत्सव ठरला.
प्रशांत येवले यांनी ‘मी माझा न्यूज चॅनल’ आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रामाणिक आणि धाडसी पत्रकारितेचा वारसा जपला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या गुलामीत न झुकता, कोणत्याही गुन्हेगारी किंवा अवैध धंदेवाल्यांशी संबंध न ठेवता त्यांनी सत्य, सामाजिक न्याय आणि सामान्य जनतेच्या समस्या यांचा पाठपुरावा केला आहे. त्यांची पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने लोकशाहीस बळकटी देणारी ठरली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आलेले प्रशांत येवले यांनी कोणताही अनैतिक मार्ग स्वीकारला नाही. व्यसनांपासून दूर राहून, आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत, त्यांनी पत्रकारितेला एक सामाजिक सेवा म्हणून घेतले. त्यांनी कोणतीही पदे, मानपदं वा आर्थिक लाभ यांचा हव्यास केला नाही.किंबहुना पक्षकाराच्या शोधासाठी 25% चे आमीष देऊन पोलीस स्टेशनला दररोज चक्रा सुद्धा मारल्या नाही उलट केवळ आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून ‘मी माझा न्यूज चॅनल’च्या माध्यमातून आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे प्रतिनिधी म्हणून समाजाच्या प्रत्येक थरातील समस्या मांडल्या.
या वाढदिवसाला उपस्थित असलेले दत्ताआबा बोरसे, नंदु शेलकर, मिलिंद भाऊ सोनवणे, जावेद शेख, लक्ष्मण सूर्यवंशी, ध्येय न्युजचे पत्रकार धनराज मेघराज पाटील, राहुल महाजन, प्रवीण बोरसे, भुवनेश दुसाने, नरसिंह भुरे , निखिल मोरे आदी सहकारी व मित्रमंडळी यांनी प्रशांत येवले यांच्या कार्याची प्रशंसा करत, त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात कोणताही ‘क्लबवाला’, बोगस पत्रकार, किंवा अवैध धंद्यातील व्यक्ती नव्हती. हेच या साधेपणाच्या कार्यक्रमाचं मोठं यश होतं.
प्रशांत येवले यांना पत्रकारितेतील प्रेरणा मिळाली ती नगरसेवक वासुआण्णा महाजन यांचे स्वीय सहाय्यक आणि अत्यंत विश्वासू पत्रकार मिलिंद भाऊ सोनवणे यांच्या विचारधारेतून. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत, त्यांनीही कधीही आपल्या मूल्यांपासून तडजोड केली नाही. स्वच्छ प्रतिमा, सुसंवादी आचारधर्म आणि प्रत्येक सामाजिक प्रश्नावर स्पष्ट भूमिका घेणे हीच त्यांची खरी ओळख बनली आहे.
‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी केवळ बातम्या दिल्या नाहीत, तर त्या बातम्यांमागची खरी भावना समाजासमोर मांडली. त्यामुळेच त्यांचं नाव कोणत्याही खोट्या प्रचारात नव्हे, तर खऱ्या जनसेवेत झळकतं. त्यांच्या बातम्यांमध्ये कोणतीही पक्षपाती भूमिका नसते, त्यामुळे समाजातील सर्व स्तरांमध्ये त्यांच्या बातम्यांना प्रचंड विश्वास मिळतो.
प्रशांत येवले यांचं व्यक्तिमत्त्व हे कोणताही गवगवा न करता, शांतपणे आणि चिकाटीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं आहे. त्यांनी कधीही कोणत्या कार्यक्रमासाठी पैसे जमा केले नाहीत कोणाच्या मागे लागले नाही कोणतंही प्रसिद्धीचं वलय मिळवण्यासाठी नाटक करणं केलं नाही. उलट, कुणी बोलावलं तरी अत्यंत नम्रपणे उपस्थित राहून, कार्यक्रमाच्या भावना समजून घेत, वस्तुनिष्ठ बातमी तयार करणं हेच त्यांचं कार्य राहिलं आहे.
त्यांच्या कार्यामुळेच आज पाचोरा तालुक्यात ‘मी माझा न्यूज चॅनल’ आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’ यांचा लोकांमध्ये विशेष विश्वास आहे. हे माध्यम केवळ बातमी पोहोचवण्याचं साधन न राहता, जनतेच्या हक्कांचं शस्त्र ठरलं आहे – आणि हे शक्य झालं आहे प्रशांत येवले यांच्या अडथळ्यांवर मात करून केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते व सर्वसामान्य नागरिक वाणी समाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छांमध्ये एकच सूर होता – “प्रशांतसारख्या पत्रकारांची गरज आज समाजाला अधिक आहे.” त्यांचा आदर्श बघून भुरट्या पत्रकारांनी आणि केवळ स्वार्थासाठी चॅनलचा वापर करणाऱ्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण करावे, अशीही भावना अनेकांनी व्यक्त केली.
शेवटी एवढंच म्हणता येईल की, ‘मी माझा न्यूज चॅनल’चे चिफब्युरो आणि ‘दैनिक पुण्य प्रताप’चे पाचोरा तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रशांत येवले यांचा हा वाढदिवस हा केवळ एक सामाजिक कार्यक्रम नव्हता, तर प्रामाणिक पत्रकारितेचा विजय सोहळा होता. त्यांच्या पुढील जीवनप्रवासाला यश, उत्तम आरोग्य, कुटुंबासह समाधान आणि जनसेवेची नवनवीन संधी लाभो, हीच प्रार्थना.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here