Home Dhyeya News Special सातगावच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. सुनील पाटील यांची जिद्दीची लढाई यशस्वी!...

सातगावच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. सुनील पाटील यांची जिद्दीची लढाई यशस्वी! कपाशी व्यापाऱ्याला 3 महिन्यांची कैद; शेतकऱ्याला अडीच लाखांची नुकसानभरपाई

0
71

Loading

पाचोरा : शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकविलेल्या शेतमालाची खरेदी करून त्याचा मोबदला देण्यास टाळाटाळ करणे, वेगवेगळी कारणे सांगून पैसे थकविणे आणि शेतकऱ्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेणे, असे प्रकार ग्रामीण भागात सातत्याने समोर येत आहेत. मात्र, अशा अन्यायाविरुद्ध शेतकऱ्याने न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार केला आणि त्याला वकिलाची खंबीर साथ मिळाली, तर न्याय मिळविण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, याची प्रचिती सातगाव (ता. पाचोरा) येथील एका प्रकरणातून आली आहे. कपाशी विक्रीचे अडीच लाख रुपये थकविणाऱ्या व्यापाऱ्याला पाचोरा न्यायालयाने 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, शेतकरी भागवत महादू पाटील यांना 2 लाख 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण न्यायालयीन लढ्यात शेतकऱ्यांची बाजू अत्यंत मेहनतीने, चिकाटीने आणि जिद्दीने मांडणारे ॲड.सुनील पाटील Mo.9960734153यांची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली आहे. सातगावच्या शेतकऱ्याचे पैसे थकविण्यापासून प्रकरणाची सुरुवात! सन 2019-20 मध्ये सातगाव येथील शेतकरी भागवत महादू पाटील यांनी गावातील किरकोळ कपाशी खरेदीदार सतीश भागवत पाटील यांना कपाशी विक्री केली होती. सदर व्यवहाराचा मोबदला 15 दिवसांच्या आत देण्याचे व्यापाऱ्याने मान्य केले होते. मात्र, ठरलेली मुदत संपूनही पैसे मिळाले नाहीत. शेतकऱ्याने पैशांची मागणी केली असता कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण सांगून व्यापाऱ्याने मुदत मागितली. त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन भागवत पाटील यांनीही सहकार्याची भूमिका घेत अतिरिक्त वेळ दिला. मात्र, त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. उलट आर्थिक परिस्थितीचे कारण देत पुन्हा मुदत मागण्यात आली. नोटरी समक्ष कबुली आणि अडीच लाखांचा धनादेश! कपाशी खरेदीचा व्यवहार झालेला असतानाही पक्की काटा पावती अथवा लेखी पुरावा उपलब्ध नसल्याने भागवत महादू पाटील यांनी त्याची मागणी केली. त्यानंतर एडवोकेट योगेश पाटील यांच्या नोटरी समक्ष सतीश भागवत पाटील यांनी कपाशी खरेदी केल्याचे मान्य केले आणि मोबदल्यापोटी स्वतःच्या सहीचा 2 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश साक्षीदारांच्या उपस्थितीत शेतकऱ्याला दिला. मात्र, बँकेत जमा केल्यानंतर हा धनादेश अनादर होऊन परत आला. त्यामुळे शेतकऱ्याला अखेर न्यायालयीन मार्ग स्वीकारावा लागला. ॲड. सुनील पाटील
Mo.9960734153 जिद्दीची कायदेशीर लढाई ठरली निर्णायक! धनादेश अनादरानंतर शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी ॲड. सुनील पाटील यांनी स्वीकारली. त्यांनी या प्रकरणात शेतकऱ्याची बाजू अत्यंत मेहनतीने आणि चिकाटीने मांडत न्यायालयीन लढा सुरू ठेवला. शेतकऱ्याच्या हक्काच्या पैशांचा प्रश्न असल्याने त्यांनी प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केला. समरी केस क्रमांक 115/2022 या खटल्यात आवश्यक कायदेशीर बाबी प्रभावीपणे मांडत शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी जिद्दीने प्रयत्न केले. अनेकदा आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्यानंतर शेतकरी न्यायालयीन प्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळे मागे हटतात; मात्र या प्रकरणात ॲड.सुनील पाटील यांनी शेतकऱ्याला कायदेशीर लढा पूर्ण करण्यासाठी खंबीर साथ दिली. त्यांच्या परिश्रमपूर्ण पाठपुराव्यामुळे या प्रकरणातील न्यायालयीन निकालाकडे विशेष लक्ष वेधले गेले आहे. 9 ऑक्टोबर 2026 रोजी न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल! पाचोरा येथील न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. अखेर दिनांक 9 ऑक्टोबर 2026 रोजी निकाल जाहीर करत न्यायालयाने कपाशी व्यापारी सतीश भागवत पाटील यांना धनादेश अनादर प्रकरणात दोषी ठरविले. त्यांना 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच फिर्यादी भागवत महादू पाटील यांना 2 लाख 50 हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. ही रक्कम अदा न केल्यास आणखी 3 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. याशिवाय नुकसानभरपाईची संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत वार्षिक 9 टक्के दराने व्याज देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांच्या लुटीला चपराक; अॅड. सुनील पाटील यांच्या लढ्याचे कौतुक! शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक घेतो. त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर पुढील शेतीचा हंगाम, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि आर्थिक जबाबदाऱ्या अवलंबून असतात. अशा परिस्थितीत शेतमाल खरेदी करून मोबदला थकविणे म्हणजे शेतकऱ्याच्या आर्थिक नियोजनालाच धक्का देणे होय. शेतकऱ्यांची अशा प्रकारे पिळवणूक आणि फसवणूक करणाऱ्या घटनांना या निकालामुळे निश्चितच कायदेशीर इशारा मिळाला आहे. शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या आणि विश्वासघातकी व्यवहार करणाऱ्यांना हा मोठा दणका मानला जात आहे. विशेष म्हणजे, आपल्या हक्काच्या पैशांसाठी लढणाऱ्या भागवत महादू पाटील यांना न्यायालयापर्यंत साथ देत ॲड.सुनील पाटील यांनी दाखविलेली मेहनत, जिद्द आणि कायदेशीर पाठपुरावा या प्रकरणात अधोरेखित झाला आहे. न्यायदेवतेसमोर शेतकऱ्याची बाजू प्रभावीपणे मांडणाऱ्या ॲड. सुनील पाटील यांचे पत्रकार संदीप महाजन यांच्याकडून अभिनंदन! सातगावच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात अत्यंत मेहनतीने आणि जिद्दीने कायदेशीर भूमिका मांडणाऱ्या ॲड.सुनील पाटील यांच्या कार्याचे विशेष कौतुक होत आहे. शेतकऱ्याच्या हक्कासाठी न्यायदेवतेसमोर ठामपणे बाजू मांडत न्यायालयीन लढा यशस्वीपणे पुढे नेल्याबद्दल पत्रकार संदीप महाजन यांनी. Mo.9960734153 वरून ॲड.सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे तसेच शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कायदेशीर प्रयत्नांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी कायद्याच्या माध्यमातून खंबीरपणे उभे राहणारे वकील आणि न्यायासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवणारे शेतकरी यांच्यामुळेच अशा प्रकरणांत न्याय मिळविण्याची आशा अधिक दृढ होते. या निकालाने शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी लढण्याचा एक महत्त्वपूर्ण संदेश दिला असून, ॲड. सुनील पाटील यांच्या मेहनतीच्या कायदेशीर लढ्याचीही विशेष दखल घेतली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!