Home Dhyeya News Special समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे!...

समाजाचे संघटन हे केवळ मेळाव्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम बनावे! – केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे

0
6

Loading

पाचोरा : समाजाची खरी ताकद ही त्याच्या एकजुटीत असते. सामाजिक मेळावे, स्नेहसंमेलने आणि विवाह सोहळ्यांच्या निमित्ताने समाजबांधव एकत्र येतात; मात्र या एकत्रीकरणाचा उपयोग केवळ भेटीगाठी आणि उत्सवापुरता मर्यादित न ठेवता, समाजातील चांगल्या प्रथा-परंपरांची देवाण-घेवाण, वैचारिक मंथन आणि सामूहिक समस्यांच्या निराकरणासाठी झाला पाहिजे. बदलत्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत असून, पुढील पिढीवर योग्य संस्कार घडविण्याच्या बाबतीत आपण कमी पडत आहोत का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. वाढते घटस्फोटाचे प्रमाण हीदेखील समाजाने गांभीर्याने विचार करण्याची बाब असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. पाचोरा

शहर व परिसरातील लेवागुर्जर, बडगुर्जर, दोडे गुर्जर, सूर्यवंशी गुर्जर आणि गोकुळवंशी गुर्जर समाजाच्या वतीने आयोजित भव्य समाज मेळावा, गुणवंत विद्यार्थी व कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव व सन्मान सोहळा 2026 रविवार, 1 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता भडगाव रोडवरील स्वामी लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय गुजर परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाध्यक्ष आणि जळगाव महानगरपालिका नगरसेवक डॉ. राधेश्याम चौधरी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये व्यासपिठावर केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आमदार नंदकिशोर महाजन, पाचोरा

नगरपालिका शिवसेना गट नेते सुमित किशोरआप्पा पाटील, पाचोरा येथील श्री शेट एम. एम. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. भि. ना. पाटील, चोपडा नगरपालिका नगराध्यक्षा नम्रता पाटील, जळगाव महानगरपालिका स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, निर्मल सीड्स संचालक डॉ. सुरेश पाटील, निर्मल इंटरनॅशनल स्कूल चेअरमन वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेशबापू पाटील, शिवव्याख्याते प्रा.सुनिलआबा पाटील, डॉ.जयंत पाटील, डॉ.स्वप्निल पाटील, केंद्रीय ओबीसी कृती समिती सदस्य नरेंद्र बडगुजर (लोहारी), प्रल्हाद गुजर (पुनगाव), किरण गुजर (शेंदुर्णी) आणि सुनिल सूर्यवंशी (शेंदुर्णी), डॉ.जगदीश शंकर महाजन, डॉ.यशवंत पाटील, बन्सीबापू पाटील, सिताराम पाटील, मंगलाबाई पाटील, अनिल महाजन, पीएसआय दिनेश बडगुजर, शेंदुर्णी डॉ.किरण सुर्यवंशी, शांताराम गुजर, डी.एल.आप्पा पाटील, संजय सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. समाजाच्या

एकत्रीकरणातून परिवर्तनाचा विचार! समाजातील विविध घटकांनी परस्परांच्या अनुभवांतून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात, रूढी-परंपरांमधील सकारात्मक बाबी पुढे न्याव्यात आणि कालानुरूप आवश्यक बदल स्वीकारावेत, असा महत्त्वपूर्ण संदेश रक्षाताई खडसे यांनी आपल्या भाषणातून दिला. कौटुंबिक नातेसंबंध अधिक दृढ करण्यासाठी संवाद, परस्पर समजूतदारपणा आणि संस्कार यांना महत्त्व देण्याचे आवाहनही त्यांनी केले. समाजाच्या सामूहिक प्रगतीसाठी अशा व्यासपीठांवरून केवळ गौरव न करता, भविष्यातील आव्हानांवरही चर्चा घडून यायला हवी, हा त्यांच्या भाषणाचा मुख्य सूर होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख, दिल्ली अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय ओबीसी कृती समिती सदस्य संदीप महाजन यांनी केले. समाजाच्या विविध घटकांना एका व्यासपीठावर आणणे, शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे, या संकल्पनेतून सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची भूमिका त्यांनी मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील व शीला पाटील यांनी प्रभावीपणे केले, तर डॉ. ग्रीष्मा स्वप्नील पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. महिला शक्तीच्या पुढाकारातून यशस्वी आयोजन! या संपूर्ण सोहळ्याच्या आयोजन व नियोजनाची धुरा महिला शक्ती समितीच्या सदस्यांनी समर्थपणे सांभाळली. डॉ. सौ. ग्रीष्मा स्वप्नील पाटील, शितल महाजन, वैशाली पाटील, सुवर्णा पाटील, ज्योती देशमुख, शीला पाटील, जयश्री महाजन, स्वाती पाटील, उज्वला महाजन, रेखा महाजन, अर्चना पाटील, प्रिया महाजन, संगीता महाजन, कविता चौधरी, अश्विनी पाटील, स्वाती पाटील, अर्चना महाजन, वैशाली महाजन आणि डॉ. कु. कादंबरी महाजन, मनोज बडगुजर (पाचोरा), अशोक पाटील (परधाडे), प्रतिक महाजन (परधाडे), विलास पाटील (पहाण), रोहित महाजन (परधाडे), विनोद महाजन (पाचोरा), बी.के.पाटीलसर (पुनगाव), राहूल पाटील (पहाण), अनिकेत महाजन (उत्राण), मुकेश पाटील(परधाडे), स्वप्निल महाजन (परधाडे), प्रमोद महाजन (लोहटार), अनिल पाटील (पुनगाव), किरण पाटील (बांबरूड), निलेश पाटील (पिंपळगाव हरे.), राजेंद्र महाजन (पिंपळगाव हरे.), विनोद महाजन (पिंपळगाव हरे.), मधुकर पाटील (तारखेडा), ईश्‍वर देशमुख (जामनेर), वैभव महाजन (उत्राण), अजय गुजर (पुनगाव), गोविंद पाटील (पाचोरा), दिपक पाटील (बांबरूड), संतोष बडगुजर (लोहारी), प्रशांत पाटील (परधाडे), अध्यक्ष डिगंबर पाटील (परधाडे), प्रफुल्ल पाटील (परधाडे) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला आणि कर्तृत्ववान व्यक्तींच्या योगदानाला सन्मान देण्याबरोबरच सामाजिक ऐक्य, कौटुंबिक मूल्ये आणि भावी पिढीच्या जडणघडणीचा विचार मांडणारा हा सोहळा पाचोरा परिसरातील गुर्जर समाजासाठी एक महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!