Home Dhyeya News Special लेवे गुजर समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन जल्लोषात संपन्न...

लेवे गुजर समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन जल्लोषात संपन्न –

0
2610

Loading

खारघर, नवी मुंबई – समाजसेवेच्या प्रेरणेतून आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साकार झालेल्या लेवे गुजर समाज मंदिराचा भव्य लोकार्पण सोहळा आणि लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळा ३० मे २०२५ रोजी सायंकाळी खारघर येथे दिमाखात आणि हजारो समाजबांधवांच्या साक्षीने उत्साहात संपन्न झाला. सुमारे ८ कोटी रुपये खर्चून उभारलेले हे समाज मंदिर म्हणजे लेवे गुजर समाजाच्या एकतेचा, प्रयत्नशीलतेचा आणि सामाजिक समर्पणाचा भक्कम पुरावा आहे. मुंबईसारख्या महानगरात असे भव्य समाज मंदिर उभारणे ही स्वतःमध्ये ऐतिहासिक कामगिरी असून, हे मंदिर समाजाच्या सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि सामाजिक उन्नतीसाठी एक आधारकेंद्र ठरणार आहे.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल) ) यांची उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांच्या हस्ते मंदिराचे लोकार्पण आणि सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख मंचावर भागवत विश्वनाथ पाटील (निंबोल) राजीव रघुनाथ पाटील, शांताराम महाजन (शिरपूर), नंदकिशोर भागवत महाजन (तांदळवाडी), रामभाऊ त्र्यंबक पाटील (निंबोल), अनिल श्रावण महाजन (वाघोदा), श्री किशोर जगन्नाथ पाटील (वाघोदा)अनिल दत्तात्रय पाटील (रावेर), बाळुभाऊ महाजन (लोणी), मनोज विनायक पाटील फोपनार
किशोर भगवान चौधरी (पिंपरी नांदु), श्रीराम गरबड महाजन (अंतुर्ली), श्री गणेश राजाराम पाटील (दापोरा ),अरूण नारायण पाटील (दापोरा), किरण रविंद्र पाटील (निंमदड), एन. व्ही. पाटील सर (ऐनपूर), प्रविण गंभीर पाटील (जळगाव), संजय राजाराम चौधरी (अहिरवाडी), शरद तुकाराम महाजन (अंतुर्ली), प्रदीप गंभीर पाटील (कुभांरखेडा), आर. एन. महाजन जामनेर कर(संभाजीनगर), नंदलाल पाटील सर (गोरगावले)
श्री विजय जगन्नाथ पाटील निंबोल,श्री विशाल गंभीर पाटील (केऱ्हाळा) डॉ संजय हरी पाटील (केऱ्हाळा)
यांचा उपस्थितीत समाजाला दिशा देणाऱ्या विचारांचे आणि अनुभवांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर व श्री भागवत विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी स्मरणिकेचे प्रकाशन झाले.
आणि ,सुनील एकनाथ पाटील (कुंभार खेडा)श्री सहदेव पाटील (चहार्डी) व राजेंन्द्र लक्ष्मण पाटील (हिवरखेडा) यांनी संपादन केलेली ही स्मरणिका समाजाच्या ५० वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा दस्तावेज आहे. कार्यकर्त्यांच्या समर्पणभावनेपासून समाजप्रमुखांच्या प्रेरणादायी लेखनापर्यंत विविध पैलूंनी समृद्ध असलेली ही स्मरणिका समाजासाठी एक अमूल्य ठेवा ठरली आहे.
सदर भुखंड मिळविणेसाठी श्री संजय मधुकर पाटील (वाघोदा) यांनी मदत केली.
या इमारतीच्या बांधकामासाठी श्री भाऊराव आनंदा महाजन कर्की ,व श्री विनायक नारायण पाटील जामनेर श्री ईश्वर रघुनाथ पाटील (दापोरा) याचं विशेष सहकार्य लाभले,श्री गणेश पाटील इंटिरियर डिझाईनर (एरंडोल) यांनी कुठलाही मोबदला न घेता मदत केली.या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नेटाने आणि उत्साहाने पार पाडले. अध्यक्ष जी. एम. पाटील, उपाध्यक्ष मोहन मोतिराम पाटील, सभापती भागवत हरी पाटील, सचिव रोहिदास देवचंद चौधरी, खजिनदार सुनील तुकाराम महाजन, सुनिल एकनाथ पाटील यांचे नेतृत्व कौतुकास्पद राहिले.
उपखजिनदार सुनिल पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यकारी मंडळातील उपसभापती एन. एम. पाटील (परधाडे), उपसचिव के. टी. पाटील (दुसखेडा), श्री एल व्ही महाजन उपसचिव (वाघोदा), श्री राजेंद्र महाजन (उत्राण) श्री सुधाकर सिताराम पाटील (तादंलवाडी) श्री एम.डी.पाटील (एरंडोल)यांचे विशेष योगदान उल्लेखनीय ठरले.
सौ. क्रांती पाटील (जळगाव) आणि सौ. कविता महाजन (कल्याण) यांनी समालोचन करून कार्यक्रमास वैचारिक समृद्धी दिली.
सौ. साधना राजेंद्र पाटील (हिवरखेडा), शैलाताई चौधरी (अध्यक्ष, माहेर महिला मंडळ, जळगाव), सौ.संध्याताई रविंद्र पाटील (उपाध्यक्ष) यांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला.समांरभ यशस्वीपणे पार करणेसाठी श्री पवन पाटील अहिरवाडी, श्री दिपक रविंद्र पाटील ह.मु खारघर (चांगदेव), श्री निळकंठ चौधरी वाघोदा व महेश महाजन अहिरवाडी , श्री महेश महाजन (तादंलवाडी)
यांनी विशेष परिश्रम घेतले.उद्घाटनानंतर झालेल्या सत्रात मंदिराच्या भविष्याच्या योजनांची माहिती देण्यात आली. हे मंदिर केवळ धार्मिक विधींसाठी मर्यादित न राहता शैक्षणिक, आरोग्यविषयक, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, वृद्धांसाठी आधार सेवा यांसारख्या उपक्रमांचे केंद्र राहणार आहे. दिशा-दर्शन, आरोग्य शिबिरे, मार्गदर्शन सत्रे, समाजजोडणी उपक्रम इत्यादींचा येथे सातत्यपूर्ण कार्यक्रम होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक, संभाजीनगर, पुणे व जळगाव येथील मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव तसेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून लेवे गुजर समाजबांधवांनी उपस्थिती लावली. एकमेकांना भेटण्याचा, सामाजिक बंध दृढ करण्याचा आणि भावनिक नाते घट्ट करण्याचा हा सुवर्णक्षण ठरला. एकात्मतेची आणि ऐक्याची भावना या कार्यक्रमातून उमटताना दिसली लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पार पडलेला हा लोकार्पण सोहळा म्हणजे समाजाच्या स्वाभिमानाचा, बंधुत्वाचा आणि उज्ज्वल भविष्यासाठी टाकलेल्या सामूहिक पावलांचा प्रतीक ठरला. कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी “समाजासाठी समर्पण, संस्कृतीसाठी मंदिर, आणि एकतेसाठी सोहळा” या घोषवाक्याचा गजर करताना उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यकारी मंडळाच्या वतीने सर्व समाजबांधवांनी या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होऊन समाजाच्या स्वाभिमानात भर टाकल्याबद्दल मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!