Home Dhyeya News Special पाचोऱ्यात 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान श्रीमद् देवीभागवत ज्ञानयज्ञ सोहळा; 16 कुलस्वामिनींच्या भक्तीपरंपरेचा...

पाचोऱ्यात 23 ते 31 ऑक्टोबरदरम्यान श्रीमद् देवीभागवत ज्ञानयज्ञ सोहळा; 16 कुलस्वामिनींच्या भक्तीपरंपरेचा जागर, नऊ दिवस विविध धार्मिक उपक्रमांची पर्वणी

0
84

Loading

पाचोरा : श्रद्धा, संस्कार आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपण्याच्या उद्देशाने पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील आशीर्वाद हॉल येथे 23 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत श्रीमद् देवीभागवत ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त येवले परिवाराच्या पुढाकारातून आयोजित या नऊ दिवसीय सोहळ्यात देवीभागवत कथेचे निरूपण, विविध धार्मिक विधी, सामूहिक उपासना आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रुतिसागर आश्रम, फुलगाव, जि. पुणे येथील माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती यांच्या कथानिरूपणातून श्रीमद् देवीभागवत ग्रंथातील आध्यात्मिक तत्त्वज्ञान, भक्तीपरंपरा आणि जीवनमूल्यांची मांडणी केली जाणार आहे. दररोज दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत कथा होणार आहे. 16 कुलस्वामिनींच्या आराधनेला विशेष स्थान या सोहळ्यात खान्देशासह विविध भागांतील 16 कुलस्वामिनींच्या श्रद्धास्थानांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सुलाई माता, उंटावद, ता. शिरपूर, जि. धुळे; जोगेश्वरी माता, जोगशेलू, ता. शिंदखेडा, जि. धुळे; म्हाळसादेवी माता, बेटावद, ता. शिंदखेडा, जि. धुळे; जोगेश्वरी माता, बेटावद; मठांबा माता, बेटावद; पेडकाई माता, चिमठाणे; जोगेश्वरी माता, मांडळ, ता. अमळनेर, जि. जळगाव; आशापुरी माता, पाटण, ता. शिंदखेडा, जि. धुळे; धनाई-पुनाई माता, चिरणेपाडा, ता. साक्री, जि. धुळे; अन्नपूर्णा माता, कापडणे, ता. जि. धुळे; एकविरा माता, देवपूर व अंबोडे, ता. जि. धुळे; सारजा-बारजा माता, बहाळ, ता. चाळीसगाव, जि. जळगाव; मनुदेवी माता, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव; भवानी माता, बेळदे, ता. निझर, गुजरात आणि खंबिका-खंबाबा माता, हिंगणी, शहादा या देवींचा समावेश आहे. 23 ऑक्टोबरला कलशयात्रा शुक्रवार, 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्री देवी मंदिर, रथ गल्ली येथून कथास्थळापर्यंत भव्य कलशयात्रा काढण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी संकल्प, ग्रंथपूजन आणि आध्यात्मिक ग्रंथ स्टॉलचा लोकार्पण सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम शनिवार, 24 ऑक्टोबर रोजी पुष्पाभिषेक आणि सामूहिक श्री ललिता सहस्रनाम कुंकूमार्चन होईल. रविवार, 25 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त 16 कुलस्वामिनी पौर्णिमा उत्सव आणि दांडिया-गरबा रास आयोजित करण्यात आला आहे. सोमवार, 26 ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण व महालक्ष्मी पूजन आणि दीपोत्सव, मंगळवार, 27 ऑक्टोबर रोजी श्री दुर्गासप्तशती पाठ, बुधवार, 28 ऑक्टोबर रोजी श्री यंत्रपूजन आणि बालसंस्कार कार्यक्रम, गुरुवार, 29 ऑक्टोबर रोजी कन्यापूजन व हस्तलिखित श्रीभागवत प्रकाशन, तर शुक्रवार, 30 ऑक्टोबर रोजी शक्तीचा जागरण-गोंधळ आणि भक्तिसंगीत संध्या होणार आहे. शनिवार, 31 ऑक्टोबर रोजी ज्ञानयज्ञाची सांगता आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. येवले परिवाराचा पुढाकार; संस्थांचे सहकार्य या सोहळ्याच्या स्वागतासाठी स्नेहल-उन्मेष शरद मेतकर, पूजा-हितेश दिलीप शिरुडे आणि अंकिता-श्रेयस रवींद्र सायंकर यांचा सहभाग आहे. आयोजनात लता वसंत येवले, लता-सुरेश रंगनाथ येवले, प्रणिता-नरेश रंगनाथ येवले, शुभांगी-गोपाल रंगनाथ येवले, मिताली-प्रणव गोपाल येवले, राधिका-योगेश वसंत येवले, तेजस्विनी-सुबोध सुरेश येवले, प्रियंका-शुभम नरेश येवले आणि चि. प्रमित गोपाल येवले यांचा समावेश आहे. अनुश्री, सान्वी, श्रेणिक, विहान, अन्वित, तस्मय आणि मीरा या बालगोपाळांची नावेही निमंत्रणपत्रिकेत नमूद आहेत. या उपक्रमाला श्री गायत्री परिवार, पाचोरा; उत्कर्ष वाणी समाज मंडळ, पाचोरा; श्री संस्कार वाणी परिवार, पाचोरा; लाडशाखीय वाणी समाजोन्नती मंडळ, पाचोरा; उन्नती महिला मंडळ, पाचोरा; आशीर्वाद युवा फाऊंडेशन, पाचोरा; महाराष्ट्र वाणी युवा मंच, पाचोरा आणि श्री विठ्ठल बालाजी सेवा संस्थान, पाचोरा-तिरुपती यांचे सहकार्य लाभणार आहे. आयोजकांनी भाविकांनी सहकुटुंब आणि स्नेहीजनांसह उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी नरेश (पप्पूशेठ) – 9422775382, योगेश – 8459424244 आणि शुभम – 7722026766 यांच्याशी संपर्क साधता येईल. स्थळ : आशीर्वाद हॉल, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव. कालावधी : 23 ते 31 ऑक्टोबर 2026.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!