रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यास अटक

पाचोरा – शहरातील रेल्वेच्या ई – तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात कारवाई सु
पाचोरा शहरात तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती RPF भुसावळ (Crime Intelligence Branch यांना मिळाली असता त्यांच्या पथकाने आज दिनांक 15 मे 2023 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पाचोरा येथील वृंदावन पॅलेस इंटरनेट कॅफेवर धाड टाकत त्यावरून योगेश वाणी नामक संशयित दुकान चालकाकडून कॉम्प्युटरचे 18 यूजर आयडी पैकी त्यातील ४ बंद व उर्वरित १४ यूजर आयडी वरून सुमारे १७ हजार रुपये किमतीची ८ तिकिटे, एक सीपीयू व एक मोबाईल असा मुद्देमाल ताब्यात घेतलेला असून जळगाव आरपीएफ कडे संशयितास सुपूर्त करण्यात आले आहे जळगाव आर पी एफ तर्फे संशयीताकडून सविस्तर तपशील घेण्याचे काम सुरू असून, याचा पुढील तपास जळगाव आर पी एफ अधिकारी महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली RPF एस. बी. चौधरी हे करीत आहेत संबधित आरोपीचा मोबाईल त्याची CDR फाईल चेक केल्यास बरीच मोठी लिंक व मोठे घबाह हाती लागु शकते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here