Breaking

विजयसिंग पाटील यांचे चिरंजीव अंकित केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण

पाचोरा – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज (दि.२३) जाहीर झाला असून जळगाव येथील अंकित विजयसिंग पाटील ने देशपातळीवर (AIR) ७६२ वा रँक मिळविला आहे. जैन इरिगेशन कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर असलेले विजयसिंग आणि एम.जे. कॉलेजमधील प्राध्यापिका डॉ. संगीता पाटील यांचा तो मुलगा असून आयआयटी

गोल्ड मेडलिस्ट तसेच ‘आयआयटीबीआयटी’ या पुस्तिकेची लेखिका सुकन्या पाटील यांचा तो धाकटा भाऊ आहे. अंकित चे मुंबई आयआयटी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण झालेले असून सद्या IIT दिल्ली येथे ‘मास्टर इन पब्लिक पॉलिसी’चे शिक्षण घेत आहे. पाटील कुटुंबीय हडसन (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तीनही टप्पे यशस्वीरीत्या पार करत अंकित पाटीलने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे अंकित पाटील व सर्व पाटील कुटुंबियांचे शहरवासियांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here