Breaking

शासनाच्या कल्याणकारी निर्णयांची जनतेला माहिती देऊन आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा !
– आ.किशोर अप्पा पाटील
आगामी निवडणुकांच्या तयारीला शिवसेनेकडून वेग

पाचोरा-पक्षसंघटना वाढी सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज होऊन राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी असे

आवाहन आ.किशोर अप्पा पाटील यांनी केले असून पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठेकीत बोलत होते.
‘शिवालय’ या आ.किशोर अप्पा पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी ११ वाजता बैठक संपन्न झाली यावेळी मंचावर जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील, मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे पदाधिकारी राजेश पाटील, कृष्णा मुळे,उपजिल्हा प्रमुख

तथा बाजार समितीचे सभापती गणेश पाटील, उपसभापती पी ए पाटील,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, तालुका प्रमुख सुनील पाटील, संजय पाटील(भूरा अप्पा),माजी जि प सदस्य पदमसिंग पाटील,शेतकी संघ संचालक जयवंत पाटील,युवराज पाटील, वाघ गुरुजी,बाजार समिती संचालक प्रकाश तांबे, लखीचंद पाटील,आबा चौधरी, योगेश गंजे, किशोर बारावकर,पंढरीनाथ पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी दोन्ही तालुक्यातील बुथनिहाय संघटना बांधणीचा आढावा

घेण्यात आला.म बुथनिहाय बुथप्रमुख, शिवदूत, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख यांची नियुक्ती करत आगामी निवडणुकांच्या तयारीला वेग दिला आहे. यावेळी मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे राजेश पाटील यांनी शासन आपल्या दारी अभियानाची व शासकीय योजनांची जत्रा उपक्रमाची माहिती

देत आगामी ३ जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाव्य दौऱ्याची माहिती दिली.तर जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी आपल्या आवेशपूर्ण भाषणातून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पुढे बोलतांना आ. पाटील म्हणाले की, विकास कामांच्या बाबतीत आपण मोठी मजल गाठली असून मतदारसंघात आपण विरुद्ध सर्वपक्ष अशी लढाई सुरू झाली असून या लढाईत कार्यकर्त्यांच्या व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आपण निम्मी लढाई याआधीच जिंकली असून आगामी निम्मी लढाई जिंकण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व मी भक्कमपणे सर्वशक्तीनिशी

आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही देखील त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी पाचोरा भडगाव मतदार संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here