पाचोरा – मध्यप्रदेशमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी खंडवा मतदारसंघाच्या
प्रचार समन्वयक म्हणून युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अँड. अविनाश भालेराव यांची काँग्रेस पक्षाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश काँग्रेसचे प्रांताध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या आदेशाने जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी यांना समन्वयक म्हणून वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.मध्य प्रदेश निवडणुकीत राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे मुख्य निरीक्षक असुन त्यांच्या मार्गदर्शनात समन्वयक अँड.अविनाश भालेराव म्हणून पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील इतरही पदाधिकारी यांची नियुक्ती झाली असून पक्षाने दिलेल्या मतदारसंघात काँग्रेसच्या विजयासाठी काम करणार असल्याचे कळवले आहे.या नियुक्तीबद्दल अँड. भालेराव यांचे प्रदेश उपाध्यक्ष आ.शिरीषदादा चौधरी,प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील,प्रदेश प्रवक्ते मदन जाधव,प्रदेश सचिव विनोद कोळपकर,पंचायतराजचे माजी जिल्हाध्यक्ष विवेक ठाकरे,
इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील आदींनी स्वागत केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.