ईगल फाउंडेशनच्या वतीने संपादक डॉ. किशोर पाटील यांना “राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४” प्रदान !

0

सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ईगल न्यूजच्या संपादिका शालन विलासराव कोळेकर, ईगल फाउंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतल्यामुळे त्यांना
ईगल फाउंडेशनच्या वर्धापनदिनानिमित्त रविवार दिनांक ९ जून २०२४ रोजी आयोजित शानदार पुरस्कार सोहळ्यात “राष्ट्रीय गरुड झेप पुरस्कार २०२४” पुरस्कार मा. डॉ. अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा तालुका- वाळवा, जिल्हा- सांगली येथे मा. आ. रामहरी रुपनवर (अप्पा), सूर्यकांत तोडकर विश्वस्त डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण समुह, ऍड. चिमण डांगे सचिव ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, प्रविण काकडे जेष्ठ नेते, सुभाष घुले उपायुक्त पणन, ज्ञानेश्वर सलगर महासचिव रा.स.पा, कृष्णा आलदर (एफसीआय), अरुण घोडके ख्यातनाम वक्ते आदी मान्यवरांच्या शुभहस्ते त्यांना प्रदान करण्यात आला.

सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या डॉ. किशोर पाटील यांना यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्याच बरोबर त्यांना मानद डॉक्टरेट उपाधी दोन वेळा बहाल करण्यात आली आहे.

सदर पुरस्कारामुळे दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील यांचे भिवंडी पत्रकार महासंघ, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुप, समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुबई, चंद्रानंद कृषी पणन व समाज कल्याण संस्था गुंदवली, स्वराज्य तोरण चारिटेबल ट्रस्ट भिवंडी आणि स्वराज्य तोरण मित्र परिवाराकडून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here