पाचोऱ्याचे सुपुत्र नेपाळमध्ये वर्ल्ड ह्यूमॅनेटेरीयन अवार्ड 2024 ने सन्मानित

0

पाचोरा ( झुंज & ध्येय न्युज )आप्पासाहेब र.भा.गरुड,  महाविद्यालय शेंदुर्णी येथील प्राध्यापक तसेच पाचोरा तालुक्यातील वेरुळी खुर्द येथील प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील व वडगाव असेरी येथील प्रा.किरण कैलास पाटील यांना नेपाळची राजधानी काठमांडू येथे त्रिभुवन विश्वविद्यालय काठमांडू, अपराजिता फाउंडेशन नेपाळ व गुरु विद्यापीठ रोहतक
यांच्यातर्फे वर्ष 2024 चा World Humanitarian Award नेपाळचे उपप्रधानमंत्री श्री नारायण काजी श्रेष्ठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दि. 9 ते 10 जुन 2024 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात दोघांनी शोध प्रबंध देखील सादर केले व यात पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आले.
शिक्षण,संशोधन व सामाजिक कार्यातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन कोरोना काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये याकरिता सर्व काळजी घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करणे, महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचे गरजुंना वाटप, तंबाखू व प्लास्टिक मुक्त अभियान राबवून “युवकांचे चारित्र्य निर्माण” करण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा सन्मान त्यांना मिळाला तसेच भविष्यात अजून चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली असे यावेळी डॉ दिनेश पाटील यांनी प्रतीपादित केले.
वृक्ष दत्तक योजनेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, कोरोना काळातील रक्तदान शिबिरांचे आयोजन, ग्रामस्वच्छता अभियान व शैक्षणिक अध्यापनापलीकडे जाऊन साहित्यिक, सामाजिक व संशोधनात्मक कार्याबद्दल हा सन्मान मिळाल्यामुळे मनस्वी आनंद झाला अशी प्रतिक्रिया प्रा किरण पाटील यांनी दिली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याला काठमांडू नेपाळ येथील खासदार डॉ अमरेश कुमार सिंह, राज्यसभा खासदार श्री कृष्ण लाल पवार, पद्मश्री डॉ महावीर गुड्डू, महात्मा गांधी काशी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. आनंद कुमार त्यागी, काठमांडू येथील त्रिभुवन विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ केशर जंग बराल, गुरु विद्यापीठ रोहतकचे निर्देशक डॉ विकास शर्मा, भारत व नेपाल येथील अभ्यासक, संशोधक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयजी गरुड, सचिव सागरमलजी जैन, संचालक मंडळ व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्याम साळुंखे तसेच प्राध्यापक व प्रशासकीय वृंद व मित्र परिवाराने त्यांचे अभिनंदन केले.परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here