पाचोरा ( झुंज & ध्येय न्युज ) तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय कॅडेट व ज्युनियर तायक्वांदो स्पर्धा आज रविवारी ( ता . १४ ) अनुभूती इंटरनॅशनल स्कूल जळगाव येथे उत्साहात पार पडल्या. पाचोरा येथील गणराज स्पोर्ट्स अकॅडमी व पाचोरा तालुका तायक्वांदो असोसिएशन च्या ८ खेळाडूंनी सहभाग होता त्यापैकी ४ सुवर्ण पदकांची कमाई केली ,तसेच 3 रौप्य तर १ कांस्य पदक प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त केले . यात पाचोरा येथील विद्यार्थी कॅडेट स्पर्धेत. रेवती देशमुख (गोल्ड मेडल). नील सोनवणे (गोल्ड मेडल). मधुरा बर्वे (सिल्वर मेडल). कौस्तुभ बोरसे (सिल्वर मेडल). रुद्रानी दिक्षित(ब्रान्स मेडल). तर ज्युनिअर गटात. ऋतुजा पाटील (गोल्ड मेडल). क्षितिज बोरसे (गोल्ड मेडल). अमित सुरवाडकर (सिल्वर मेडल). पदक प्राप्त केले.
दरम्यान सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूची १९ रोजी चंद्रपूर व २६ रोजी बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे .खेळाडूंना प्रशिक्षक सुनील मोरे सर यांचे मार्गदशन लाभले .
सर्व खेळाडूंचे जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे व पाचोरा येथील समाजसेवक रमेश भाऊ मोर आणि पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.