श्रीमती कमलताई पाटील यांनी आपल्या वाढदिवस दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्ठांन्न भोजन देऊन केला साजरा

0

पाचोरा  : शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई पाटील यांच्या वाढदिवसाला पांडे दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिष्टान्नयुक्त भोजनाचे वाटप करण्यात आले. श्रीमती कमलताई पाटील यांचा वाढदिवस अनोख्या प्रकारे साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून आज पाचोरा येथील पांडे दिव्यांग विद्यालयातील विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी श्रीमती कमलताई पाटील, वैशालीताई सुर्यवंशी, कु. सिध्दी सुर्यवंशी, चि. पुष्कर सुर्यवंशी यांनी स्वत: आग्रह करून विद्यार्थ्यांना विविध खाद्यपदार्थ वाढले. विद्यालयाच्या वतीने श्रीमती कमलताई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here