वामन मेश्राम यांनी घेतलीवैशालीताई सुर्यवंशींची सदिच्छा भेट

0

पाचोरा – बहुजन मुक्ती पार्टीचे नेते वामन मेश्राम यांनी आज निर्मल सीडस येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेतली.
बहुजन मुक्ती पार्टीचे नेते तथा ख्यातनाम बहुजनवादी विचारक वामन मेश्राम हे परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. आज ते पाचोरा येथे आले असता त्यांनी निर्मल सीडस येथे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांची सदिच्छा भेट घेतली.
प्रारंभी वैशालीताई सुर्यवंशी यांनी वामन मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर दोन्ही मान्यवरांनी विविध विषयांवर चर्चा केली. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here