ऋषी पंचमीला वैशालीताई सुर्यवंशी यांच्यातर्फेमहिला भाविकांसाठी चहापानाची सुविधा

0

पाचोरा: ऋषीपंचमी निमित्त तालुक्यातील बांबरूड महादेवाचे येथील देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकांसाठी आज वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने चहापानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली.
त्रिवेणी संगमावरील बांबरूड महादेवाचे येथील महादेव मंदिर हे असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असून आज येथे ऋषी पंचमीच्या पर्वावर परिसरातील हजारो महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या सर्व महिला भाविकांसाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने आज चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here