पाचोरा – येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भडगाव शहराने माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांना प्रचंड मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा विश्वास दिला आहे. दिलीपभाऊ वाघ यांच्या प्रचारफेरीत शहरातील जनसमुदायाने जोशपूर्ण सहभाग घेतला. अपक्ष म्हणून त्यांना शिट्टी हे चिन्ह मिळाल्यानंतर त्यांनी भडगावमधून प्रचाराला सुरुवात केली आणि शहरातील प्रत्येक गल्ली आणि चौकात गगनभेदी घोषणांनी त्यांचे स्वागत करण्यात आले.
प्रचाराची शिट्टी वाजली
श्रीराम मंदिर येथे नारळ वाढवून त्यांनी प्रचार फेरीला सुरुवात केली. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, युवक आणि महिलांचा प्रचंड जनसमुदाय त्यांच्या पाठिशी उभा होता. ढोल-ताशांच्या गजरात आणि उत्साहाने गजबजलेल्या या प्रचारफेरीत शिट्टी वाजवत कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. शहरातील गल्लीबोळ शिट्टीच्या आवाजाने दणाणून गेले. दिलीपभाऊंच्या समर्थकांनी मोठ्या उत्साहात रॅलीमध्ये भाग घेतला, आणि शहरातील प्रत्येक चौकात त्यांचे स्वागत केले.
विजयाचा विश्वास आणि निर्धार
यावेळी दिलीपभाऊ वाघ यांनी आपला निवडणूक चिन्ह शिट्टी ही प्रगतीची शिट्टी असून भ्रष्टाचार आणि गद्दारीच्या विरोधात ती धोक्याची शिट्टी ठरेल असे सांगितले. त्यांनी शेतकरी, शेतमजूर, युवक आणि महिलांसाठी काम करण्याची प्रतिज्ञा केली. भडगावातील नागरिकांनी मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता ही विजयाची शिट्टी वाजल्याशिवाय राहणार नाही, असा आत्मविश्वास दिलीपभाऊ वाघ यांनी व्यक्त केला.
रॅलीचा मार्ग
श्रीराम मंदिर येथून सुरू झालेली ही रॅली आझाद चौक, भड खंभा, भोईवाडा, देशमुखवाडा, नुरानी नगर, पठाण वाडा, जकातदार गल्ली, खोल गल्ली, पवार वाडा, बालाजी मंदिर गल्ली, जागृती चौक, कासट चौक, शनी चौक, वाचनालय गल्ली, नगरपालिका चौक, मेन रोड, नगरदेवळा दरवाजा, तहसील कार्यालय चौक आणि बस स्टँड परिसर अशा मार्गांवरून गेली.
नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद
प्रचार फेरीच्या मार्गावर अनेक ठिकाणी दिलीपभाऊ वाघ यांचे मोठ्या उत्साहात स्वागत झाले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले, आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील ज्येष्ठ नागरिकांनीही दिलीपभाऊंना आशीर्वाद दिला, आणि त्यांना आगामी निवडणुकीत भडगावमधून प्रचंड मताधिक्य मिळेल याचा विश्वास व्यक्त केला.
या उत्स्फूर्त प्रचारात शहरातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे दिलीपभाऊ वाघ यांचा विजय निश्चित आहे असे चित्र निर्माण झाले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.