पाचोऱ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला मिळाले ‘स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी’ यांचे नाव: एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा गौरव

0

पाचोरा – दि. 15 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उद्योजकता व नाविन्य विभागाने राज्यातील 132 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची नावे बदलण्याबाबतचे शासकीय परिपत्रक जारी केले. पाचोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला “स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाचोरा” असे नाव देण्यात आले. हे नाव वाचताच कुतूहल निर्माण झाले. पाचोरा पंचक्रोशीतील अनेक ज्येष्ठ व्यक्ती आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात शोध घेतल्यानंतर स्व. विश्राम रावजी काळे गुरूजी यांचे नाव उलगडले. त्यांच्या संघ समर्पित जीवनप्रवासाचा एक थक्क करणारा इतिहास आहे.
1985-86 च्या काळात साप्ताहिक

विवेक या हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वृत्तपत्राने अनेक तरुणांना संघ विचारधारेकडे आकर्षित केले. मी संदीप महाजन यांच्या वाचनाची सुरुवातही याच साप्ताहिकातून झाली. त्यावेळी सध्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हयाचे ज्येष्ठ नेते सदाशिव (आबा) त्र्यंबक पाटील यांच्या माध्यमातून साप्ताहिक विवेक या वृत्तपत्राचा परिचय झाला. त्यांच्या प्रेरणेने हिंदुत्वाशी परिचय झाला
विवेक साप्ताहिकाच्या प्रेरणेने मी संदीप महाजन संघशाखा आणि संघटनेत सक्रीय सहभाग घेतला.
शालेय जीवन जगत असताना श्री गो से हायस्कूल मधील शिक्षक आदरणीय बी एस कुलकर्णी सर हे आर एस एस शाखेचे प्रचार होते व त्यांचे पुतणे उदय कुळकर्णी आणि आमचे मित्र अ‍ॅड. सुनील पाटील, दिनेश भि. पाटील, मनीष काबरा, आणि स्व. सुनील सराफ हे मित्र मंडळ शाखेत नियमित सहभागी होत.
अमळनेर येथे आयोजित हिवाळी शिबिरात थंडीत टेंटमध्ये राहणे, शाखेतील दिनचर्या, आणि संघाच्या

शिस्तबद्ध जीवनशैलीचा अनुभव त्यांनी घेतला. याच काळात स्व काळे गुरूजी   यांच्यासह स्व कमळे गुरुजी , बी एस कुलकर्णी सर, यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली.
     पाचोरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला जे नाव देण्यात आले ते संघ समर्पित जीवन स्व.विश्राम रावजी काळे गुरूजी. यांच्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला जे काही फोटोज व माहिती प्राप्त झाली ती पुढीलप्रमाणे –
स्व. विश्राम रावजी काळेगुरूजी संघ समर्पीत जीवन
(जन्म :दि. १६ फेब्रुवारी १९२५ मृत्यु: दि.३१ जुलै२०११)
स्व. विश्राम रावजी काळे तथा काळे गुरुजी याांचा जन्म १६ फेब्रुवारी १९२५ रोजी साकेगाव ता. भुसावळ जिल्हा
जळगाव येथे झाला. त्याांचे प्राथमिक शिक्षण साकेगाव येथे झाले. १९४२ साली ते फायनल म्हणजे त्यावेळची इ.७वी
बोर्ड परीक्षा उत्तीर्ण  झाले. आणि १९४२ला ते भुसावल येथे लोकल बोर्डच्या शाळेत मास्तर ( शिक्षक) म्हणुन कन्या
शाळा क्रमाांक १ येथे रुजु झाले. इयत्ता ५ वीत असताांना त्यांचा १९३९ मध्ये त्यांचा संघांच्या शाखेशी संपर्क आला. त्यांनी
साकेगाव येथे १९४० ला सायं शाखा सूरू केली. १९४२ ते १९४५ पर्यंतच्या स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी होत असत
सन १९४५ तो १९४८ पर्यंत ते संघाचे विस्तारक म्हणुन मुक्ताईनगर, वरणगाव, नाडगांव बोदवड येथे दर शनीवार व रविवार
प्रवास करत. सन १९४८ ला ते अमळनेर तालुक्यात विस्तारक म्हणून शनिवार रविवार जायचे, सन १९४८ च्या प्रथम
संघबंदित त्याांनी संघ सत्याग्रहात भाग घेतला तसेच त्या काळात महात्मा गांधी यांची झालेली हत्या आणि त्यामुळे संघ व ब्राम्हण समाजा विरुद्ध उफळलेला व्देश

त्यात काळे गुरुजी जरी पाथरवट समाजाचे होते तरी ते संघाचे व नांव ब्राम्हण साम्य असल्याने शिक्षकाची नौकरी त्याांना गमवावी लागली. त्यानांतर १९४८
ते १९५२ ते पुर्ण वेळ संघाच्या कार्या साठी नासिक येथील तीळ भांडारेश्वर गल्लीतील संघ कार्यालयात राहु लागले. १९५२
ते १९५८ पर्यत त्याांनी विविध उद्योग करून पाहिलेत सायकल रिपेअर, फोटो फ्रेमींग पण यश येई ना. काही काळ
तर त्यांनी  बाांबरूड ता. पाचोरा येथे त्याांचे सासरे कै. आनंदा चौधरी याांचे सोबत  दगडाच्या खाणीव दगडही फोडले
त्यावेळेच्या आमदाराने त्यांचा  प्रश्न विधान सभेत मांडला व त्यांनां पुन्हा शिक्षक म्हणुन पुन्हा  नियुक्ती मिळाली व ते
१९५८ ला वेरूळी ता. पाचोरा येथे रुजु झाले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी गाळण नगरदेवळा आणि सांगमेश्वर येथे ज्ञानदानाचे
कार्य केले व हजारो विद्यार्थी घडवले नगरदेवळा येथील वास्तव्यात १९७७ ला संघ शाखा सुरू केली नगरदेवळा मंडळात
त्यावेळी सात ते आठ शाखा लागत. अनेक शिबीरांना ते बाल व तरुणाांना घेवुन जात. रा.स्व. संघांच्या विविध  पदांचे दायीत्व
त्याांनी सांभाळले. पाचोरा व भडगाव तालुक्याचे कार्यवाह म्हणुन ही दायीत्व पार पाडले  सन १९८९ नगर देवळा येथुन
पाचोरा येथे आल्यावर मा. बाळकृष्ण कुलकणी सर यांच्या समवेत त्यांनी आदर्श शिक्षण प्रसारक संस्था परधाडे ची
स्थापना केली त्या संस्थेचे स्व काळे गुरुजी संस्थापक अध्यक्ष होते. या संस्थेच्या विवेकानंद टेक्नीकल इंन्स्टीटयुट मार्फत कमी
पैशात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ताांत्रीक ज्ञान उपलब्ध करून दिले. त्यावेळी संस्थेच्या उद्घाटनासाठी स्व. मा. नानाजी देशमुख आले होते. ग्रामीण भागात त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता.सन १९८९ ला व सन १९९२ ला अस दोन्ही वेळेस ते वय
व प्रकृतीची तमा न बाळगता रामजन्मभुमी आंदोलन व कारसेवेत सहभागी झाले होते त्यावेळेस ते झाशी जेल मध्ये पंधरा
दिवस होते. अखिर भारतीय पाथरवट

समाज महासंघाचे ते मार्गदर्शक होते. ते साप्ताहिक विवेकचे अभिकर्ता
प्रतीनीधी होते. दि. ८ डिसेंबर २००२ ला त्यांचा सरसांघचालक सुदर्शनजीच्या उपस्थित नागपुर येथे संकल्पयात्री म्हणुन
त्याांना गौरवण्यात आले होते. त्या काळात तडवी भिल्ल याांच्या मुलाांसाठीची वसतीगृह पाचोरा,येथील विवेकानंद
टेक्नीकल इंन्स्टीटयुट  मध्ये मा. नंदुजी गिरजे या  या प्रचारकांच्या सहायाने सुरू केले होते.सन २००४ पासुन ते संघचालक होते.
पाचोरा येथील कै. कमळेगुरूजी ,बाळकृष्ण कुलकणीसर, कै सुनिल सराफ , मनिष काबरा, संचेती परीवार ,नाना वाणी, रमेश मोरे
यांचा त्यांच्याशी विशेष स्नेह होता. शेवटच्या श्वासापर्यत संघकार्य हे त्याचे  जीवनध्येय होते ते  त्यांनी निष्ठेने पार पाडले दि.३१ जुलै २०११ ला श्रावण शुद्ध प्रतिपदेला त्याांनी इहलोकात यात्रा संपवली तरी ते
अजुनही अनेकाांचे प्रेरणा स्त्रोत व स्मृतीत राहीले आहेत.
सदरची माहिती त्यांची सुपुत्र व भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान व परिषद महाराष्ट्र प्रदेशचे नाशिक अध्यक्ष उद्धवराव विश्राम काळे यांच्याकडून घेतली आहे अशा या स्वर्गीय विश्राम रावजी काळे गुरुजी यांचे नाव महाराष्ट्र शासनाने पाचोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला म्हणजे त्यांच्या कार्याला एक अभिवादन आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here