पाचोरा: ( ध्येय न्युज प्रतिनीधी -अविनाश माळी, कुऱ्हाड Mo.9766719218 ) : श्रीरामपूर शहरातील प्रसिद्ध ‘नानाजू चहा’ हा चहाचा ब्रँड आता पाचोऱ्यात दाखल झाला असून, त्याच्या
शाखेचे भव्य उद्घाटन शनिवारी, 18 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजीव गांधी टॉऊन हॉल भाजी मार्केट समोरील दुकान क्रमांक 12 येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नानाजू चहा परिवाराच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली. नानाजू चहाचे मुरतुझा ताय्यब अली बोहरी व त्यांचा परिवार
उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “आमची चहा ब्रँड 1986 पासून दर्जेदार चव, शुद्धता व ग्राहकसेवेच्या वचनबद्धतेने लोकप्रिय आहे. आम्हाला विश्वास आहे की, पाचोऱ्यातील नागरिकही या चवीचा मनमुराद आनंद घेतील.”
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे उपस्थित प्रत्येकाला चहाचा आस्वाद मोफत देण्यात आला. पाचोऱ्यातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला. या मोफत चहा उपक्रमामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ग्राहकांनी या नव्या शाखेला शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
उद्घाटनानंतर, ग्राहकांनी ‘नानाजू चहा’च्या वैशिष्ट्यपूर्ण स्वादांची प्रशंसा केली. या ब्रँडची खासियत म्हणजे दर्जेदार चहा, शुद्ध घटक व प्रेमाने दिलेली सेवा. कार्यक्रमात शहरातील तरुण, महिला व वृद्ध नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
नानाजू चहा परिवाराने पाचोऱ्यातील ग्राहकांसाठी विशेष ऑफर जाहीर केल्या आहेत. येथे चहाच्या विविध प्रकारां सोबतच स्नॅक्सचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ही शाखा
केवळ चहा पिण्याचे ठिकाण नसून, मित्रमंडळी व कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी खास स्थान ठरणार आहे.
नानाजू चहा परिवाराने या शाखेद्वारे पाचोऱ्यातील ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडण्याचे आश्वासन दिले. “दर्जेदार सेवा व स्वादाचा वारसा टिकवून नवनवीन उपक्रम राबवून ग्राहकांचे प्रेम जिंकणे, हे आमचे ध्येय आहे,” असे संस्थापक मुरतुझा बोहरी यांनी सांगितले. या उद्घाटन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नानाजू चहा परिवाराच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.