![]()
पाचोरा – शहराच्या खाद्यसंस्कृतीत एक नवा आणि अनोखा अध्याय जोडणारा उपक्रम ‘स्वाDish Veg’ शाकाहारी रेस्टॉरंटच्या माध्यमातून सुरु होत आहे. बनोटीवाला कुटुंबियांच्या पुढाकारातून भडगाव रोडवरील बनोटीवाला फार्म हाऊस येथे नव्याने उभारण्यात आलेल्या या शाकाहारी भोजनगृहाचे उद्घाटन येत्या गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ ते १० या वेळेत एका धार्मिक आणि स्नेहमिलनाच्या सोहळ्यात संपन्न होणार आहे. या खास प्रसंगी भाविक वातावरणात ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करण्यात आली आहे. पारंपरिक धार्मिक विधी, भक्तिपूर्वक पूजन आणि प्रसाद वितरणाद्वारे या नव्या उपक्रमाची शुभ सुरुवात करण्यात येणार आहे. या मंगल प्रसंगी उपस्थित राहून शुभाशीर्वाद द्यावेत, असा सादर आग्रह आयोजकांनी केला आहे. भडगाव रोड वरील बनोटीवाला फार्म हाऊस लागत पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही निसर्गाच्या सान्निध्यात, प्रशस्त व सुशोभित परिसरात उभारलेले हे रेस्टॉरंट हे केवळ एक भोजनगृह नसून एक अनुभव केंद्र असेल. इथे स्वच्छता, पारंपरिक चव, आधुनिकतेचा स्पर्श, आणि ग्राहकसेवा या चारही गोष्टींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळणार आहे. ‘स्वाDish Veg’ मध्ये उत्तम प्रतीचे विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थ मिळणार असून, पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळीपासून ते पंजाबी, साउथ इंडियन, चायनीज व इतर लोकप्रिय शाकाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. स्वादात नव्हेच, तर आरोग्यदृष्ट्याही उत्कृष्ट अशा भोजनाची खात्री येथे दिली जाणार आहे.
‘स्वाDish Veg’ ही केवळ व्यवसायिक संकल्पना नसून बनोटीवाला कुटुंबाची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती आहे. पारंपरिक आदरातिथ्य, शुद्धता आणि संस्कृती या मूल्यांच्या अधिष्ठानावर उभे असलेले हे रेस्टॉरंट आजच्या ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करत नव्या पिढीला स्वादाचा नवा अनुभव देण्याच्या उद्देशाने उभारले आहे. ‘स्वाDish’ या नावात ‘स्वाद’ आणि ‘डिश’ या दोन महत्त्वपूर्ण कल्पनांचा संगम आहे – ज्यामध्ये पारंपरिक चव आणि आधुनिक रुचिपरिपूर्णपणा यांचा मेळ साधला गेला आहे.
या उद्घाटनाच्या निमित्ताने आयोजकांनी ‘श्री सत्यनारायण महापूजा’ आयोजित करून एक आध्यात्मिक आणि मंगल वातावरण तयार केले आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनात शांतता, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी अशा पूजांचे महत्त्व मोठे आहे. या पूजेसाठी पंचामृत, नैवेद्य, फलाहार आणि आरतीचा समावेश असणार आहे. भक्तिपूर्ण गजरात आणि मंत्रोच्चारांमध्ये एकत्र येऊन नव्या प्रवासाची सुरूवात करणं हे केवळ धार्मिक विधी नव्हे तर एक सामाजिक ऐक्याचं प्रतीकदेखील ठरेल.
या प्रसंगी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आयोजकांना आपल्या शुभेच्छांचा उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, आणि एकत्र येऊन नव्या रेस्टॉरंटच्या यशासाठी प्रार्थना करावी, अशी विनंती करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कुटुंबमित्र, व्यावसायिक, पत्रकार, आणि सामाजिक संस्था या सोहळ्यास उपस्थित राहणार असून, एक प्रेरणादायी आणि मनःपूर्वक आठवण बनणार आहे.या नव्या उपक्रमामागे असलेली संकल्पना, कल्पकता आणि मेहनत ही कांतीलालशेठ, जीवनभाऊ, मनोजभाऊ, प्रवेश, मितेश, पूर्वश श्रीश्रीमाळ या बनोटीवाला कुटुंबियांची आहे. सामाजिक प्रतिष्ठा, व्यावसायिक अनुभव आणि सद्भावना यांचे मूर्तिमंत प्रतीक असलेले हे कुटुंब गेली अनेक दशके ‘बनोटीवाला ज्वेलर्स’च्या माध्यमातून पाचोरकरांच्या मनात घर करून आहे. आता ‘स्वाDish Veg’ या नावाने ते अन्नसंस्कृतीच्या क्षेत्रात एक नवा अध्याय लिहिणार आहेत. ‘बनोटीवाला ज्वेलर्स’ ही गांधी रोड, पाचोरा येथील एक सुप्रसिद्ध आणि विश्वासार्ह संस्था असून, गेली अनेक वर्षे दर्जेदार दागिने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या या संस्थेचा नव्या व्यवसाय क्षेत्रातील प्रवेश ही एक स्वागतार्ह बाब ठरते. ग्राहकांचा विश्वास हीच खरी ताकद मानणाऱ्या या फर्मचा ‘स्वाDish Veg’ हा पुढचा पायरी आहे. पाचोरा शहरात उत्तम शाकाहारी जेवणासाठी एक नवे, सुगंधित, स्वच्छ आणि आधुनिक स्थान निर्माण होत आहे. ‘स्वाDish Veg’ हा उपक्रम केवळ एक व्यवसाय नसून, ग्राहकांचे समाधान आणि संस्कृतीशी नाते जपणारा सेवाभावाचा एक प्रयत्न आहे. आपल्या उपस्थितीने या प्रवासात सहभागी व्हा, शुभेच्छा द्या, आणि स्वादाच्या या नव्या प्रवासाचा भाग व्हा – हीच आयोजकांची सादर नम्र विनंती!

ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






