![]()
पाचोरा – तालुक्यातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अनेक दशके उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पाटील कुटुंबातील एक अत्यंत व्यावसायिक, संवेदनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. अनंतदादा पाटील (Mo.- 9421635777 ) यांनी नुकत्याच पार पडलेल्या दि पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड निवडणुकीत सर्वाधिक 3874 मते मिळवून विजय मिळवत तालुक्याच्या राजकीय पटलावर आपल्या यशस्वी झंझावाती प्रवेशाची नोंद केली आहे. त्यांच्या या विजयाने केवळ बँकिंग क्षेत्रात नव्हे तर आगामी काळातील पाचोऱ्याच्या सामाजिक-राजकीय जीवनात नवचैतन्याचे आणि परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. डॉ. अनंतदादा हे तारखेडा या पाचोरा तालुक्यातील गावाचे सुपुत्र. त्यांचा जन्म गुर्जर समाजातील एक अत्यंत सुसंस्कारित आणि सेवाभावी कुटुंबात झाला. त्यांचे वडील स्वर्गीय डॉ. बाबुराव उर्फ बा.बा. पाटील हे केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे तर आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही अग्रणी होते. दि पाचोरा पिपल्स बँकेचे चेअरमन, श्री एम.एम. महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालय समितीचे अध्यक्ष आणि अखेरपर्यंत पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून त्यांनी ग्रामीण भागात आधुनिक शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य यासाठी मोठे योगदान दिले. या महान वारशाचे जतन करत, डॉ. जयंतदादा पाटील आणि डॉ. यशवंत पाटील या बंधूंनीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षण आणि सहकार क्षेत्रात नेतृत्व बजावले. जयंतदादा सध्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे संचालक असून, त्यांनी दि पाचोरा पिपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन म्हणूनही कार्य केले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. अनंतदादा पाटील यांचे यश अधिक प्रेरणादायी ठरते. डॉ. अनंत पाटील यांनी वैद्यकीय पदवी मिळवल्यानंतर 2006 साली पाचोरा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्य सुरू केले. 2016 पर्यंत त्यांनी शासकीय आरोग्य सेवेत हजारो रुग्णांना निःस्वार्थ सेवा दिली. नंतर त्यांनी खाजगी वैद्यकीय सेवा सुरू केली आणि पाचोऱ्यात “रुग्णांचा डॉक्टर” म्हणून त्यांची ओळख बळकट झाली. पैसा, प्रसिद्धी किंवा राजकीय लाभ या गोष्टींपेक्षा “सेवा” हीच त्यांच्या आयुष्याची केंद्रबिंदू राहिली. ते लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना “अण्णा” म्हणून परिचित आहेत. सुसंवाद, शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचा स्पर्श हे त्यांच्या स्वभावाचे विशेष पैलू. या साऱ्या गुणांचा परिणाम म्हणूनच त्यांच्या आजूबाजूला सर्व समाजाचे लोक निसंकोचपणे त्यांच्याशी जोडले गेले आहेत. जरी अनेक वर्षांपासून त्यांच्यावर राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी दबाव होता, तरी त्यांनी नेहमीच नम्रपणे त्या गोष्टी टाळल्या. पण यंदाच्या दि पाचोरा पिपल्स बँक निवडणुकीत त्यांनी प्रथमच स्वतःचा उमेदवारी अर्ज भरत आर्थिक क्षेत्रातील निवडणुकीत आपला सहभाग नोंदवला — आणि थेट 3874 मतांच्या आघाडीने सर्वाधिक मते मिळवणारे उमेदवार ठरले. हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नाही, तर तो समाजाच्या विश्वासाचा विजय, सेवाभावाच्या संस्कारांचा विजय, आणि एक नवा लोकनेता तयार होतो आहे याचे संकेत आहेत. ही निवडणूक म्हणजे त्यांचा राजकीय अविष्कार म्हणावा लागेल. गुर्जर समाजाचे अध्यक्ष असलेल्या डॉ. जयंतदादांच्या प्रेरणेतून आलेले, वैद्यकीय सेवा देणारे, शिक्षणावर निष्ठा ठेवणारे आणि आता आर्थिक निर्णयक्षमतेच्या केंद्रस्थानी पोहोचलेले डॉ. अनंत पाटील सर्व समाजघटकांचे प्रतिनिधीत्व करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पुढे आले आहेत. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, जैन, मराठा, माळी, कुणबी, वाणी, ब्राह्मण अशा सर्व समाजघटकांमधून त्यांना भरघोस पाठिंबा मिळाला. कारण त्यांनी कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येकाशी माणूस म्हणूनच संवाद साधला आणि माणुसकीच्या भावनेतूनच काम केले. डॉ. अनंतदादा यांच्या रूपात एक समंजस, ज्ञानी, भावुक आणि लोकाभिमुख नेतृत्व पुढे येत आहे. बँकिंग क्षेत्राच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता, पारदर्शक कर्जव्यवस्था, लघु उद्योजकांसाठी सहकार्य आणि ग्रामीण विकासाच्या योजनांची अंमलबजावणी हे त्यांचे प्राधान्यक्रम असतील, असे संकेत त्यांच्या विचारातून दिसतात. त्यांचा संयम, सौम्यपणा, दूरदृष्टी आणि समाजाभिमुख दृष्टिकोन पाहता, भविष्यात पाचोरा तालुका नव्हे, तर जिल्हा आणि राज्य पातळीवरही त्यांच्या नेतृत्वाची गरज भासू शकते. अनेक राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे सहकार्याची आणि नेतृत्वाची विनंती केलेली असूनही त्यांनी अद्याप कोणताही पक्ष स्वीकारलेला नाही, ही गोष्ट त्यांची स्वाभिमानी, मूल्यप्रधान आणि स्वयंपूर्ण विचारसरणी दर्शवते. पाचोरा पिपल्स बँकेच्या विजयानंतर डॉ. अनंतदादा पाटील यांनी केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पहिला टप्पा गाठलेला आहे. ज्या प्रकारे त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यसंघाने संघटितपणे, शिस्तबद्ध रीतीने ही निवडणूक लढवली, ते पाचोऱ्यातील युवकांना आणि भावी नेतृत्वाला एक सकारात्मक प्रेरणा देणारे ठरेल. “अनंतदादांचा विजय म्हणजे माणुसकीचा विजय आहे!” “पाचोऱ्यात असे नेतृत्व हवेच होते…” “अण्णा म्हणजे आमच्या मनातला विश्वास…” अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियावर, गावगाड्यांत आणि शहरांमध्ये उमटत आहेत. गावातील लहान मुले, महिला मंडळं, रुग्ण, ज्येष्ठ नागरिक सर्वांनीच आपल्या ‘अण्णा’च्या विजयानंतर फटाके वाजवत, पेढे वाटत आनंद साजरा केला. एक यशस्वी डॉक्टर, एक सेवाभावी व्यक्तिमत्त्व, एक सहकारी विचारांचा आधारवड, आणि आता एक राजकीय नेतृत्वाचे आश्वासक रूप — डॉ. अनंतदादा पाटील. त्यांनी दि पाचोरा पिपल्स बँकेच्या माध्यमातून लोकमानसात आपले अस्तित्व सिद्ध केले आहे. आजच्या काळात अशा लोकाभिमुख, सभ्य आणि दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची फार गरज आहे. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने डॉ. अनंत पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक भविष्याकरिता शुभेच्छा!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






