पाचोरा ( सरेश शिंपी Mo.9175556750 ) येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज सेवा मंडळ, पाचोरा यांच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २२ जुलै २०२५ रोजी, मंगळवार दिनी भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सर्व समाजबांधव व भगिनींनी एकत्र येऊन या सोहळ्यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे औचित्य साधून संत नामदेव महाराज यांची पालखी नगरपरिक्रमेच्या स्वरूपात हरिनामाच्या गजरात मिरवणार असून, हळदीकुंकू, सत्यनारायण पूजा व महाप्रसाद आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण वातावरण भक्तिमय होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे राहणार आहे
सकाळी ७.३० वाजता
संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू कार्यक्रम व तिर्थप्रसाद व अल्पोपहाराचे आयोजन भुषण शिंपी यांच्या निवासस्थानी (तावरे कन्या शाळेजवळ, देशमुख वाडी) करण्यात आले आहे.
सकाळी ८.०० वाजता
त्याच ठिकाणाहून संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेची पालखी भव्य मिरवणूक स्वरूपात निघणार असून, हरिनाम संकीर्तनाच्या गजरात पालखी मार्गक्रमण करणार आहे.
पालखी मार्ग: देशमुखवाडी → राधेकृष्ण मंदिर → रंगार गल्ली → सोनार गल्ली → जामनेर रोड → छत्रपती शिवाजी महाराज चौक → स्वा. सै. अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौक ( न पा ) प्रकाश टॉकी → समाज मंदिर.
पालखीचा समारोप समाज मंदिरात होणार आहे. सर्व समाजबांधवांनी आपले व्यवसाय बंद ठेवून कुटुंबासह या मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत
कै. कुसुमबाई सदाशिव सोनवणे सभागृह, कै. अप्पासाहेब वाल्मीक ओंकारशेठ शिंपी समाज मंदिर, संत नामदेव महाराज मंदिर, संत नामदेव महाराज मार्ग, संभाजीनगर, पाचोरा येथे संजीवन समाधी सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम पार पडणार आहे.
दुपारी १.३० ते ४ वाजेपर्यंत
सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भिकनशेठ शिंपी बसवणार असून
व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती नयनाताई निकम (जिल्हा अध्यक्षा, जळगाव जिल्हा महिला आघाडी, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था) विजय खैरनार (म.का. सदस्य, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था)
राजेंद्र शिंपी (माजी जिल्हा संघटक, अ.भा. क्ष.अ. शिंपी समाज मध्यवर्ती संस्था) कार्यक्रम व्यवस्थापक: धनराजशेठ सोनवणे, प्रविण शिंपी,
भुषण शिंपी, जितेंद्र शिंपी,
एकनाथ शिंपी व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिंपी समाज बंधू-भगिनींसह
सुरेश शिंपी (सचिव)
मुकेश जगताप (उपाध्यक्ष)
विजय कापुरे (उपाध्यक्ष) दिपक प्रकाशशेठ (कार्याध्यक्ष) डॉ. मनोहर बाविस्कर (अध्यक्ष)
अंजली सोनवणे (महिला सचिव) दिपाली शिंपी (महिला उपाध्यक्षा)
नयना निकम (महिला कार्याध्यक्षा) मिना जगताप (महिला अध्यक्षा)
युवती मंडळाचे जान्वी जगताप (सचिव) श्रृती शिंपी (उपाध्यक्षा) दिपाली कापुरे (कार्याध्यक्षा)
अश्विनी शिंपी (अध्यक्ष)
युवक मंडळ: अक्षय पुणेकर (सचिव) विजयन निकम (उपाध्यक्ष) गणेश खैरनार (युवाध्यक्ष)
सदर कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिभाव, सामाजिक ऐक्य आणि सांघिक सहभागाच्या माध्यमातून समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केले जात आहे. सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, अशी नम्र विनंती आयोजकांनी केली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.