![]()
पाचोरा – शहरातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेत एक महत्त्वाची भर घालणाऱ्या ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स’ या नव्या शाखेचा भव्य शुभारंभ श्री गणेशांच्या कृपेने आणि मंगल वातावरणात होणार आहे. मागील दहा वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात अविरत व प्रामाणिक सेवा देत विश्वासार्हतेचा पाया मजबूत करणाऱ्या कासार कुटुंबाने आता पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात ही नवी शाखा सुरू करून आरोग्यसेवेला अधिक व्यापक रूप देण्याचा संकल्प केला आहे. “शाखा जरी नवीन, विश्वास मात्र तोच” या ब्रीदवाक्यानुसार ग्राहकांचा विश्वास हेच आमचे सर्वात मोठे भांडवल असल्याचे संचालकांनी स्पष्ट केले आहे. दि. १४ डिसेंबर २०२५, रविवार रोजी या नव्या शाखेचा औपचारिक शुभारंभ सोहळा संपन्न होणार असून सकाळी श्री सत्यनारायणाची महापूजा व सायंकाळी अल्पोपहाराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमासाठी शहरातील नागरिक, ग्राहक, हितचिंतक आणि शुभेच्छुकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जनऔषधी संकल्पनेअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार औषधे उपलब्ध करून देण्याचे ध्येय ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल’ने अंगीकारले असून वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता किफायतशीर औषधे उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे संचालकांचे मत आहे. याच उद्देशाने पाचोरा शहराच्या मध्यवर्ती भागात ही शाखा सुरू करण्यात येत असून याचा लाभ शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनाही होणार आहे. यापूर्वी कार्यरत असलेल्या ‘जनऔषधी मेडीकल’ आणि ‘कासार सर्जिकल हाऊस’ या संस्थांच्या माध्यमातून कासार कुटुंबाने वैद्यकीय क्षेत्रात विश्वासार्ह सेवा देत नागरिकांचा उदंड प्रतिसाद व प्रेम मिळवले आहे. रुग्णहिताला प्राधान्य, योग्य मार्गदर्शन, दर्जेदार औषधे आणि पारदर्शक व्यवहार या मूल्यांमुळे या संस्थांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच विश्वासाच्या बळावर आता ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स’ ही नवी शाखा सुरू होत असून भविष्यात आरोग्यसेवेत अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला आहे. या नव्या उपक्रमामागे श्री. विनीत कृष्णराव द. कासार, श्री. विशाल कृ. कासार, श्री. यज्ञेश कृ. कासार तसेच चि. समर्थ वराडे यांचे मार्गदर्शन व सक्रिय सहभाग लाभला असून “YOUR TRUST, OUR ACHIEVEMENT” या संकल्पनेनुसार ग्राहकांचा विश्वास हेच आमचे खरे यश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नवीन शाखा संकट मोचक हनुमान मंदिर शेजारी, श्रीराम मंदिर चौफुली, जामनेर रोड (मेन रोड), पाचोरा येथे सुरू होत असून नागरिकांना सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी ही शाखा उपलब्ध होणार आहे. जनऔषधी औषधांसह मेडिकल, केमिस्ट अॅन्ड ड्रगिस्ट तसेच जनरल स्टोअरच्या सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणार असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी सोय होणार आहे. या शुभप्रसंगी पाचोरा शहरातील सर्व नागरिकांनी, ग्राहकांनी व हितचिंतकांनी आवर्जून उपस्थित राहून या नव्या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन कासार कुटुंबाच्या वतीने करण्यात आले असून ‘न्यू कासार जनऔषधी मेडीकल अॅन्ड जनरल स्टोअर्स’चा हा शुभारंभ पाचोरा शहराच्या आरोग्य क्षेत्रात एक सकारात्मक व महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




