सलग १४ व्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम; न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची यशस्वी भरारी

Loading

पाचोरा – शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची परंपरा जपत जयकिरण प्रभाजी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल, पाचोरा या विद्यालयाने यंदाच्या इयत्ता दहावीच्या निकालात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सलग १४ व्या वर्षी विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत आपल्या गुणवत्तेची भक्कम छाप उमटवली आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण पाचोरा शहरासह पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणांची कमाई करत यशाची नवी उंची गाठली. विद्यालयातून प्रथम क्रमांकाने कु. कनिष्का सौरभ जैन हिने ९३.४० टक्के गुण प्राप्त करत यशाचा मान पटकावला. तर द्वितीय क्रमांकाने कु. आर्या मिलिंद येवले हिने ९२.८० टक्के गुण मिळविले. तृतीय क्रमांकावर कु. तनिषा अनिल माळी हिने ९१ टक्के गुणांसह स्थान मिळविले. तसेच चौथ्या क्रमांकाने कु. श्रद्धा अनिल पाटील हिने ९०.८० टक्के तर पाचव्या क्रमांकाने जान्हवी जितेंद्र देवरे हिने ९०.२० टक्के गुण मिळवून विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला. विशेष म्हणजे विद्यालयातून ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे तब्बल १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, हे यश विद्यालयातील दर्जेदार शिक्षणपद्धती, शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचे फलित मानले जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न ठेवता त्यांचा आत्मविश्वास वाढविणे, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन, पालक-शिक्षक संवाद आणि शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण यामुळेच विद्यालयाने वर्षानुवर्षे उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिनेश बोथरा, उपाध्यक्षा गौरी कुलकर्णी, सचिव जीवन जैन, सहसचिव संजय बडोला, खजिनदार जगदीश खिलोशिया, स्कूल कमिटी चेअरमन लालचंद केसवानी, स्कूल कमिटी सचिव रितेश ललवानी, संचालक संजय चोरडिया, गुलाब राठोड,गोपाल पटवारी, प्रिती जैन, संगिता बोथरा, महेंद्रकुमार हिरण, अशोककुमार मोर, शेखरकुमार धाडीवाल यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे विद्यालयाचा शैक्षणिक दर्जा अधिक उंचावला असून, आगामी काळातही अशीच गुणवत्ता कायम राहील, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. विद्यालयाच्या प्राचार्य पुष्पलता पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेली मेहनत, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेला निकाल हा त्यांच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा परिणाम असून, भविष्यातही ते विविध क्षेत्रात यश मिळवून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सी.ई.ओ. अतुल चित्ते यांच्यासह निर्मला पाटील, प्रतिभा मोरे, रुपाली जाधव, प्रिती शर्मा, पुजा पाटील, कविता जोशी, भाग्यश्री ब्राम्हणकर, अश्विनी पाटील, ज्योती बडगुजर, रूपाली देवरे, विद्या थेपडे, शितल महाजन, स्मिता देशमुख, किशोरी साळुंखे, वाल्मिक शिंदे, किरण बोरसे, शालिनी महाजन, निवृत्ती तांदळे, कृष्णा शिरसाठ, आनंद दायमा, मनोज बडगुजर, सुनिता शिंपी, पुजा लिंगायत, शिवाजी पाटील आणि विकास मोरे यांनीही सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या या सातत्यपूर्ण यशामुळे पाचोरा परिसरातील पालकांचा शाळेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण देणारी विश्वासार्ह संस्था म्हणून न्यू इंग्लिश मिडीयम School ने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा समतोल राखत विद्यालयाने यंदाही आपल्या यशाची गरुडझेप कायम ठेवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here