सिद्धीविनायक हॉस्पिटलच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त पाचोरात भव्य आरोग्य तपासणी शिबिर; महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभासाठी नागरिकांना सुवर्णसंधी

Loading

पाचोरा – शहरातील आरोग्य सेवेत विश्वासार्ह नाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या सिद्धीविनायक हॉस्पिटल पाचोरा डायबेटीक केअर सेंटरच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त तसेच गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. 26/05/2026 रोजी भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. हे शिबिर जामनेर रोडवरील कृष्णापुरी येथे भारत डेअरीजवळ असलेल्या सिद्धीविनायक हॉस्पिटल पाचोरा डायबेटीक सेंटर येथे सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत पार पडणार आहे. शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहितीही देण्यात आली असून यासाठी ओरिजिनल रेशन कार्ड, रेशन कार्डमधील सर्व सदस्यांचे आधार कार्ड तसेच आयुष्यमान कार्ड तयार असल्यास संबंधित सर्व सदस्यांची आयुष्यमान कार्डे सोबत आणणे आवश्यक राहणार आहे. शिबिरात हृदयरोग विभागामार्फत 2D-Echo, ECG, कार्डीओग्राफ तसेच रक्तदाब तपासणी करण्यात येणार असून एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर, रिनल एन्जिओप्लास्टी, आय.व्ही.सी. फिल्टर व बायपास शस्त्रक्रियेसंदर्भात तज्ज्ञ मार्गदर्शन दिले जाणार आहे. विशेष म्हणजे ASD/VSD म्हणजे हृदयाला असलेले छिद्र बिना ऑपरेशनने बंद करण्याबाबतही रुग्णांना माहिती व सल्ला देण्यात येणार आहे. जनरल मेडिसीन विभागात लिव्हर, पित्ताशय व पोटाशी संबंधित विविध गंभीर आजारांवर विशेष तपासणी व मार्गदर्शन केले जाणार आहे. दारूमुळे होणारे लिव्हरचे विकार, अन्ननलिकेचे आजार, पोटात पाणी होणे, लिव्हरवरील सूज, कावीळ, रक्ताच्या उलट्या, पित्ताशयातील खडे व इन्फेक्शन तसेच पॅनक्रियाटायटीजसारख्या आजारांबाबत नागरिकांना तज्ज्ञ सल्ला उपलब्ध करून दिला जाणार आहे. याशिवाय सवलतीच्या दरात रक्त तपासणीची सुविधाही उपलब्ध राहणार आहे. शासकीय योजनेत समाविष्ट न होणाऱ्या विविध शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी हे शिबिर मोठा आधार ठरणार असल्याचे बोलले जात आहे. या आरोग्य उपक्रमाचे आयोजन डॉ. राहुल प्रभाकर झेरवाल, सिद्धीविनायक हॉस्पिटल पाचोरा डायबेटीक सेंटर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून गौरव पाटील (मो. 8600859568) व कृष्णकांत पाटील (मो. 7228299202) हे संपर्क समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. तसेच सिद्धीविनायक हॉस्पिटल पाचोरा डायबेटीक सेंटरचे सर्व कर्मचारी वृंद या शिबिरासाठी विशेष सहकार्य करत आहेत. अधिक माहितीसाठी आशिष भिरुड (9373350009) व रत्नशेखर जैन (7030571111) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here