![]()
पाचोरा : शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंगलचरणम् फाऊंडेशन, जळगाव आणि राष्ट्रीय बंजारा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “गुणगौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता दहावी व बारावी सत्र २०२५ मध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी, नीट (NEET) परीक्षेत ५०० पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे गुणवंत तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या सोहळ्यात गौरव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचाच नव्हे तर त्यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार होणार असल्याने या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. बंजारा समाजातील शैक्षणिक प्रगतीचा नवा अध्याय ठरणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होणार असून नव्या पिढीला उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळणार आहे. हा गौरव सोहळा रविवार, दि. २८ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत रामदेव लॉन्स, जारगाव चौफुली, पाचोरा येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन भिकनभाऊ जाधव, प्रा. पी. टी. चव्हाण सर, चित्राताई जाधव, दिलीपभाऊ वाघ, नितीन नाईक व किशोर बारवकर यांच्या उपस्थितीत होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुमित किशोर आप्पा पाटील, डॉ. हर्षल पाटील, प्रवीण ब्राह्मणे, सुमित आबा सावंत, मिनाक्षीताई चव्हाण, संजयभाऊ राठोड, विनित राठोड, शशिकलाताई चव्हाण, आरतीताई राठोड, सोमनाथ पवार, कल्पनाताई राठोड, बबलु चव्हाण, साहेबराव चव्हाण, संजय जयराम राठोड, पुष्पा मोतीराम राठोड, दिनकरभाऊ राठोड, संदिपभाऊ राठोड, विलास जाधव, रविंद्र राठोड, अॅड. प्रशांत मालखेडे, शेषराव राठोड, संजय पवार, राहुल राठोड, प्रा. विद्या कुमरे व दिलीप राठोड उपस्थित राहणार आहेत. याशिवाय नाना राठोड, तोताराम राठोड, अॅड. वसिम बागवान, विष्णु चव्हाण आणि राज राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. समाजातील शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अरविंद पवार (अध्यक्ष, मंगलचरणम् फाऊंडेशन, जळगाव) यांनी केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































