![]()
पाचोरा – शहरात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात केवळ उपचार देणे पुरेसे नसते, तर रुग्णांचा विश्वास जपणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आणि प्रत्येक रुग्णाला आत्मीयतेने सेवा देणे हीच खऱ्या अर्थाने यशाची गुरुकिल्ली असते. अशाच विश्वासाच्या भक्कम पायावर उभा राहिलेला Aastha Dental Hospital – Microscopic Root Canal & Implant Center आज आपल्या यशस्वी वाटचालीतील आणखी एका महत्त्वपूर्ण टप्प्याचे स्वागत करत आहे. गेल्या १२ वर्षांत हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणाऱ्या या दंतसेवा केंद्राने आधुनिक सुविधा, डिजिटल उपचारपद्धती आणि अत्याधुनिक उपकरणांच्या बळावर नव्या पर्वाची सुरुवात केली आहे. या यशामागील प्रमुख प्रेरणास्थान म्हणजे डॉ. अनंत जैन. पाचोरा शहरात जन्मलेले आणि लहानाचे मोठे झालेले डॉ. जैन यांनी आपले प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणही पाचोराच्याच मातीत पूर्ण केले. स्थानिक पातळीवर शिक्षण घेत देशातील आधुनिक दंतचिकित्सा क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण करणे ही पाचोरा शहरासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे. विशेष म्हणजे ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन हे पाचोरा येथील श्री गो से हायस्कूल मध्ये शिक्षक असताना शालेय जीवनातील डॉ.अनंत जैन हे त्यांचे विद्यार्थी होते. शिक्षकांकडून मिळालेले संस्कार, कठोर परिश्रम, शिस्त आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी आधुनिक दंतसेवेच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या या यशाकडे केवळ वैयक्तिक प्रगती म्हणून नव्हे, तर पाचोरा शहराच्या गौरवशाली यशकथांपैकी एक म्हणूनही पाहिले जात आहे. या आनंददायी क्षणाचे औचित्य साधत गुरुवार, दि. १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजल्यापासून Aastha Dental Hospital येथे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. वेळेअभावी प्रत्येक शुभेच्छुक, हितचिंतक, रुग्ण व मित्रपरिवारापर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य नसल्याने ही निमंत्रणपत्रिका आग्रहाचे आमंत्रण समजून स्वीकारावी, अशी विनम्र विनंती आयोजकांनी केली आहे. सहकुटुंब व सहपरिवार उपस्थित राहून महापूजेनंतर तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. आयोजकांच्या मते, प्रत्येक उपस्थित पाहुण्याचे आगमन हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठे आशीर्वाद, प्रेरणा आणि सन्मान ठरणार आहे. Aastha Dental Hospital चा प्रवास हा सातत्य, समर्पण आणि गुणवत्तेचा आदर्श मानला जातो. अवघ्या तीन डेंटल चेअर्सपासून सुरू झालेली ही वाटचाल आज एकाच छताखाली सात अत्याधुनिक डेंटल चेअर्सनी सुसज्ज आधुनिक हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबत उपचारांचा दर्जा उंचावण्यावर भर देत रुग्णांना अधिक वेगवान, अचूक आणि आरामदायी सेवा मिळावी यासाठी प्रत्येक टप्प्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात आला आहे. दंतचिकित्सेतील अचूक निदानासाठी आता रुग्णांना In-house CBCT आणि OPG या अत्याधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे दात, जबडा आणि हाडांची सखोल तपासणी अल्पावधीत शक्य होत असून उपचारांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. विशेषतः इम्प्लांट, रूट कॅनॉल आणि गुंतागुंतीच्या दंतउपचारांमध्ये या सुविधांचा मोठा लाभ रुग्णांना मिळत आहे. याशिवाय पारंपरिक पद्धतीने दातांचे माप घेण्याऐवजी आता Intraoral Scanner या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांना अस्वस्थता न होता अत्यंत अचूक डिजिटल प्रतिमा तयार होतात आणि उपचार अधिक जलद, सुरक्षित व परिणामकारक बनतात. डिजिटल डेंटिस्ट्रीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल भविष्यातील आरोग्यसेवेचे नवे दालन उघडणारे ठरत आहे. Aastha Dental Hospital ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे येथे रुग्णांच्या सोयीचा प्रत्येक स्तरावर विचार करण्यात आला आहे. उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांचा प्रतीक्षेचा वेळ आनंददायी आणि उपयुक्त ठरावा यासाठी स्वतंत्र लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उपचाराची प्रतीक्षा करतानाही सकारात्मक वातावरणाचा अनुभव रुग्णांना मिळतो. Microscopic Root Canal & Implant Center या विशेष सेवेमुळे अत्यंत सूक्ष्म आणि अचूक उपचार शक्य होत असून रुग्णांच्या दातांचे नैसर्गिक संरक्षण, वेदनामुक्त उपचार आणि दीर्घकालीन परिणामकारकता यावर विशेष भर दिला जात आहे. आधुनिक उपकरणे, प्रशिक्षित तज्ज्ञांची सेवा आणि गुणवत्तेची सातत्यपूर्ण बांधिलकी यामुळे डॉ. अनंत जैन यांच्या नेतृत्वाखाली Aastha Dental Hospital ने परिसरात विश्वासार्ह आणि अत्याधुनिक दंतचिकित्सा केंद्र म्हणून भक्कम ओळख निर्माण केली आहे. “A New Chapter of Trust, Care & Smiles” या संकल्पनेला साजेसा हा नवीन अध्याय केवळ हॉस्पिटलच्या विस्तारापुरता मर्यादित नसून, अधिक सक्षम, अधिक आधुनिक आणि अधिक रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याच्या दृढ संकल्पाचे प्रतीक आहे. “The Smile You Desire, Experience You Deserve” या ध्येयवाक्यानुसार प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम उपचार आणि आत्मीय सेवा देण्याची परंपरा पुढील काळातही अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने सर्व नागरिक, हितचिंतक, मित्रपरिवार आणि रुग्णांनी Aastha Dental Hospital, Shop No. 07 & 08, Near Krushi Utpanna Bazar Samitee, Behind Vitrag Provision, Bhadgaon Road, Pachora – 424201 येथे उपस्थित राहून श्री सत्यनारायण महापूजेचा तसेच तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8928037290 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.





























