![]()
पाचोरा : शहरातील आरोग्यसेवेच्या वाटचालीत आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत भावसार परिवाराच्या पुढाकारातून ‘साई जनरल हॉस्पिटल’ नव्या व अत्याधुनिक वास्तूमध्ये कार्यारंभ करत आहे. कुलस्वामिनी व श्री साईबाबांच्या कृपाशीर्वादाने उभारण्यात आलेले हे रुग्णालय आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण उपचार आणि सेवाभावी वैद्यकीय दृष्टिकोन यांचा संगम ठरणार असून पाचोरा व परिसरातील नागरिकांसाठी विश्वासार्ह आरोग्यकेंद्र म्हणून नवी ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत आहे. भडगाव रोडवरील पुजारी नगर येथे साकारलेल्या या नव्या वास्तूमुळे रुग्णांना अधिक सुसज्ज वातावरणात उपचार मिळण्यास मदत होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रात सातत्याने बदलणाऱ्या गरजा लक्षात घेऊन रुग्णकेंद्रित सेवा, आधुनिक उपचारपद्धती आणि मानवी मूल्यांना प्राधान्य देण्याचा संकल्प या रुग्णालयाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा मान अनिता अरुण फुलझेले यांच्या शुभहस्ते पार पडणार असून, या सोहळ्याला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून किशोर आप्पा पाटील (कार्यसम्राट आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा), दिलीपभाऊ वाघ (माजी आमदार, पाचोरा-भडगाव), वैशालीताई सुर्यवंशी (भाजपा नेत्या), डॉ. सतीश टाक (वैद्य अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पाचोरा), अमोलभाऊ शिंदे (भाजपा युवा नेते), सचिनदादा सोमवंशी (काँग्रेस नेते) आणि मंगेश देवरे (मुख्य अधिकारी, नगरपरिषद पाचोरा) उपस्थित राहणार आहेत. याशिवाय PDA मधील सर्व मान्यवर डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, पत्रकार बंधू-भगिनी तसेच मेडिकल व लॅब क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिक प्रतिष्ठेचा ठरणार आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध घटक एका व्यासपीठावर एकत्र येत असल्याने ही केवळ वास्तूची सुरुवात नसून समाजाभिमुख वैद्यकीय सेवेच्या नव्या अध्यायाची नांदी मानली जात आहे.या उपक्रमामागे भावसार परिवाराची अनेक वर्षांची सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची परंपरा आहे. रेखा व अशोक रामदास भावसार (पत्रकार व माजी सरपंच), मिनाक्षी व डॉ. गणेश रामदास भावसार, अनुपमा व डॉ. दीपक अशोक भावसार तसेच वृषाली व डॉ. विवेक गणेश भावसार यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेले हे स्वप्न आरोग्यसेवेला अधिक व्यापक दिशा देणारे ठरणार आहे. कुटुंबातील नव्या पिढीचे प्रतिनिधी देवांश दीपक भावसार आणि आराध्य दीपक भावसार यांच्या उपस्थितीनेही या आनंदसोहळ्याला भावनिक स्पर्श लाभणार आहे. पाचोरा शहराचा झपाट्याने होत असलेला विकास आणि वाढत्या आरोग्य गरजांच्या पार्श्वभूमीवर सुसज्ज, विश्वासार्ह आणि सेवाभिमुख रुग्णालयांची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. अशा वेळी ‘साई जनरल हॉस्पिटल’चे नव्या वास्तूमधील पदार्पण नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा नवा पर्याय उपलब्ध करून देणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व परिवारातर्फे भावसार परिवारास नव्या हॉस्पिटलच्या शुभारंभासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. ‘साई जनरल हॉस्पिटल’च्या माध्यमातून आरोग्यसेवा, समाजसेवा आणि रुग्णकल्याणाची ही वाटचाल अधिक यशस्वी, समृद्ध आणि जनमानसाच्या विश्वासाला पात्र ठरो, हीच सदिच्छा.





























