Breaking

जवानांचा सत्कार हा देशभक्ती जोपासणारा कार्यक्रम –
पो. नि.अवतारसिंग चव्हान

0

चोपडा-– येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी, तेली समाजातर्फे आजी माजी जवानांचा, तसेच गुणीजनांचा भव्य सत्कार संपन्न झाला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6:30 वाजता तेली समाज मंगल कार्यालय, संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर, श्रीराम नगर चोपडा येथे तेली समाजाचे विश्वस्त उपाध्यक्ष आदर्श शिक्षक श्री टी. एम .चौधरी सर अध्यक्षस्थानी होते

तर प्रमुख अतिथी म्हणून चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अवतार सिंह ठाकूर सिंह चव्हाण उपस्थित होते. श्री चव्हाण साहेब यांचे शुभहस्ते समाजातील आजी-माजी जवानांचा व गुनी जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री के. डी. चौधरी यांनी संस्थेच्या कार्याचा परिचय करून देत उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेचे विश्वस्त माजी अध्यक्ष श्री संजय कौतिक चौधरी, पोलीस श्री पाटील, स्वातंत्र सैनिकांच्या विधवा पत्नी स्व.डुमन मंगा चौधरी यांच्या धर्मपत्नी श्रीमती पार्वताबाइ डुमन चौधरी, ह-भ-प गोपीचंद महाराज, ह भ प विजय महाराज देवरे, हभप नेरकर आप्पा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्री चव्हाण साहेब आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जवानांच्या समस्यांची मला पूर्ण जाणीव आहे. जवानांच्या प्रति त्यांचा सन्मान करण्याचे, या समाजाचा तसेच संस्थेचा उपक्रम उल्लेखनीय असून देशभक्ती जोपासणारा आहे. जवानांचे कार्य हे अतिशय महत्त्वाचे असून जवान हे आपल्या देशाची शान आहे. कोरोणाच्या काळात निवृत्त जवान त्याचप्रमाणे सीमेवरचे जवान यांचे कार्य अतिशय जबाबदारीचे व जरुरीचे होते. त्यांनी अतिशय उत्तम रित्या कर्तव्य पार पाडले. जवानान्च्या परिवाराच्या मागे देश उभा आहे .समाज उभा आहे .हा संदेश या उपक्रमाने दिला आहे. त्यामुळे तेली समाज व या संस्थेने केलेला उपक्रम हा प्रेरणादायी आहे, असे नमूद केले. यावेळी त्यांनी समस्त चोपडे करांना देशवासीयांना व उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. समारंभाचे अध्यक्ष श्री टी. एम चौधरी सर यांनी उपस्थित जवानांचा, त्यांच्या मातापित्यांचा, गुणीजनांचा परिचय करून देत त्यांचा कार्याचा आढावा दिला, आपल्या भाषणात त्यांनी जवान शिक्षक व शेतकरी यांचे देश उभारण्यासाठी महत्त्वाचे योगदान असल्याचे नमूद करत जवान शिक्षक व शेतकरी हा देशाचा कणा असल्याचे स्पष्ट केले. टी. एम. बापू यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सीमेवर तैनात मनिष संजय थोरात या जवानाच्या माता सौ मीना थोरात व पिता श्री संजय थोरात यांचा सत्कार केला .सीमेवर तैनात चेतन पांडुरंग चौधरी यांचा सत्कार त्यांचे पिताश्री श्री पांडुरंग बाबुराव चौधरी यांनी स्वीकारला. यावेळी कैलास रामदास मराठे, पितांबर पाटील, कैलास नवल बोरसे, प्रभाकर फकीरा माळी, वामनराव बाबूराव चौधरी, रमेश चंदू पाटील, गणेश गुलाब चौधरी, महेश नवनीत मराठे, या आजी-माजी जवानांचा त्यांच्या परिवारासह त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. एस टी. महामंडळात सेवेत असणारे श्री उमेश मोतीलाल चौधरी व श्री विनोद गुलाब चौधरी यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम सेवा दिल्याने त्यांचाही सत्कार श्री अवतार सिंह चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी स्वातंत्र सैनिक डुमन मंगा चौधरी यांच्या धर्मपत्नी श्रीमती पार्वताबाई चौधरी यांचा सत्कार करून वीरगती प्राप्त स्वातंत्र्य सैनिकांना व क्रांतिकारकांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी श्री प्रशांत सुभाष चौधरी, श्री देवकांत के .चौधरी, निशांत सुभाष चौधरी, सौ .नम्रता सुभाष चौधरी, श्री गौरव अशोक पाटील आदींनी उत्तम प्रकारे केली. सुरुवातीला श्री अवतार सिंह चव्हाण यांचे शुभहस्ते संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मुर्तीस हार अर्पण करण्यात आला. यावेळी श्री वामनराव चौधरी यांनी के डी सर यांचेकडून जी सेवा होत आहे त्याबद्दल के डी सरांचे व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आभार मानले. त्याचप्रमाणे श्री कैलास बाबुराव मराठे यांनी जवानांचा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त केले. श्री प्रशांत सुभाष चौधरी यांनी उत्तम रित्या सूत्रसंचालन करून शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here