Home Dhyeya News Special पाचोरा नगरपालिका प्रशासनाची तत्पर कार्यवाही, धोकादायक ठिकाणी नवीन लोखंडी जाळी बसविली

पाचोरा नगरपालिका प्रशासनाची तत्पर कार्यवाही, धोकादायक ठिकाणी नवीन लोखंडी जाळी बसविली

0
50

Loading

पाचोरा : शहरातील भुयारी पुलापासून श्री गो. से. हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावरील तुटलेली गटारावरील लोखंडी जाळी, वाढता अपघाताचा धोका आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी, पादचारी तसेच वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजने सविस्तरपणे प्रसिद्ध करून नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची अत्यंत सकारात्मक आणि संवेदनशील दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित ठिकाणी नवीन, मजबूत लोखंडी जाळी बसवून नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुटलेल्या जाळीमुळे या परिसरात अपघाताचा धोका वाढला होता. विशेषतः शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी, सायकलस्वार, दुचाकी चालक तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे तुटलेली जाळी दिसून येत नसल्याने अनेकदा सायकली व दुचाकींची चाके अडकण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती होण्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजने हा प्रश्न ठळकपणे मांडत तातडीच्या उपाययोजनेची मागणी केली होती. या वृत्ताची दखल घेत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी नवीन व मजबूत लोखंडी जाळी बसविण्याचे काम पूर्ण केले. तसेच या कामासाठी नगराध्यक्ष सौ. सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावरकर, गटनेते सुमित पाटील तसेच सर्व संबंधित नगरसेवकांनी दाखविलेली सकारात्मक भूमिका, तत्परता, समन्वय आणि जनहिताची बांधिलकी विशेष कौतुकास पात्र ठरली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लोकहिताच्या प्रश्नावर त्वरित निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल सर्वांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे. नवीन लोखंडी जाळी बसविल्यानंतर विद्यार्थी, विद्यार्थिनी, सायकलस्वार आणि दुचाकी चालकांसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित झाला असून वारंवार घडणाऱ्या अपघातांना मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. त्यामुळे परिसरातील पालक, नागरिक, व्यापारी व वाहनधारकांनी समाधान व्यक्त करत नगरपालिका प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. लोकहिताच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने त्याची तातडीने दखल घेऊन केलेली ही कार्यवाही निश्चितच लोकाभिमुख, संवेदनशील, जबाबदार आणि अनुकरणीय असल्याची भावना व्यक्त होत आहे. मुख्याधिकारी मंगेश देवरे, संबंधित विभागातील सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, नगराध्यक्ष सौ. सुनीताताई पाटील, उपनगराध्यक्ष किशोर बारावरकर, गटनेते सुमित पाटील तसेच सर्व नगरसेवकांचे या जनहिताच्या तातडीच्या कार्यासाठी परिसरातील नागरिकांकडून मनःपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रसारमाध्यमे यांच्या समन्वयातून नागरिकांच्या समस्या तत्परतेने मार्गी लागू शकतात, याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले असून भविष्यातही शहरातील नागरी प्रश्नांवर अशाच वेगाने आणि संवेदनशीलतेने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!