Home Dhyeya News Special तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात श्री. गो.से. हायस्कूलचा द्वितीय क्रमांक

तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात श्री. गो.से. हायस्कूलचा द्वितीय क्रमांक

0
134

Loading

पाचोरा : श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा येथे दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित तालुकास्तरीय विज्ञान नाट्य उत्सवात ‘AI : मित्र, साधन की धोका?’ या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रभावी नाट्य सादरीकरण करून द्वितीय क्रमांकाचे उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध पैलू, त्याचे फायदे, दैनंदिन जीवनातील उपयोग तसेच त्यातून निर्माण होणारे संभाव्य धोके नाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य आणि जबाबदारीने वापर करण्याचा संदेश या नाट्य सादरीकरणातून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे श्री. गो.से. हायस्कूल, पाचोरा या विद्यालयाने तालुकास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. या उल्लेखनीय यशासाठी विद्यार्थ्यांना अर्चना काळे आणि आर. एन. बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी नाट्याची तयारी करताना विषयाचा सखोल अभ्यास करून कृत्रिम बुद्धिमत्तेचे सकारात्मक उपयोग आणि संभाव्य परिणाम यांचा प्रभावीपणे वेध घेतला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एल. पाटील, उपमुख्याध्यापक पी. एम. पाटील तसेच पर्यवेक्षक ए. आर. गोहील, आर. बी. बांठीया आणि एम. टी. कौंडिण्य यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक व कलात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळा परिवारातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!