Breaking

विष्णुआण्णा यांच्या माता-पित्यांच्या स्मरणार्थ वाढदिवसा निमीत्त शीत शवपेटीचे लोकार्पण

पाचोरा-शहरातील जुने बसस्टॅड परिसरातील युवकांचा गोल्डन ग्रुप म्हणजे क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक,धार्मीक क्षेत्रातील समाजभिमुख कामे करून पंचक्रोशीत नावलौकिक प्राप्त केलेला ग्रुप तात्कालीन कालखंडात युवकांच्या संघटीत विविध उपक्रमामुळे या ग्रुपची वेगळीच ओळख होती तात्कालीन परिस्थीतीत संपर्काची साधने नसल्याने या परिसरातील युवकांचे संपर्क & बैठकीचे ठिकाण म्हणजे विजय महाले यांचे मुकेश ऑफसेट & विष्णुआण्णांची पानटपरी

तसे म्हटले तर या दोघांच्या जोडीला परीसरातील युवकांचा ग्राहक कमी & इतर त्रासच जास्त होता परंतु या जोडीने कधीही त्रस्त म्हणुन डोक्याला आडी पडू दिली नाही
यापैकी विष्णुआण्णा यांच्या बाबत वाढदिवसाचे औचित्य साधून प्रामुख्याने नमुद करायचे म्हटले तर विष्णुआण्णांचे मुळगाव पाचोरा तालुक्यातील तारखेडा होय विष्णु आण्णांनी आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास

1968 पासून पाचोऱ्यात सुरवात केली सुरवातीला एक महिना वाघ डेअरी येथे काम केल्या नंतर शर्मा कापड दुकानात 1.5 रु रोजाने म्हणजे 45 रु महिनाभर काम हे 5 ते 6 वर्ष काम केले नंतर अग्रवाल सोसायटी मध्ये पुढील 4/5 वर्ष हे 120 रु महिन्यांनी करून शेतकरी संघ मध्ये 220 रु महिन्यांनी नोकरी मिळाली पण काही वर्ष काम करून स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून फेब्रुवारी 1985 मध्ये स्वतःचा एक छोटा टेबल लावून पान टपरी सुरु केली त्या साठी मार्गदर्शन व आर्थिक मदत 700 रु मित्र दगळू भाऊ भडगाव यांनी केली व तेव्हा आयुष्याची सुरवात झाली टपरी- चहा व्यवसाय करतांना अनेक चढ- उतार सहन करत परिस्थीतीशी झुंज देत राहीले मात्र शेवटपर्यंत श्रम,चिकाटी सोडली नाही याचाच परिपाक म्हणुन विष्णुआण्णाच्या मेहनतीला फळ आले ते गुणवंत – किर्तीवंत दोन मुलांच्या रुपाने ते देखील बालपणापासून वडीलांच्या व्यवसायात मदत करीत असत कालांतराने मोठा मुलगा हाताशी आला व पुढे प्रविण सोडा म्हणून एक स्वतःची जागा घेऊन त्यात सोडा फाउंटन mashin प्रथमच पाचोऱ्यात सुरु केली व लहान मुलगा

आय टी आय करून स्वतःचा व्यवसाय करून वडिलांना हाथ भार लावण्यास सुरवात केली मात्र विष्णुआण्णांच्या मनात एक इच्छा सतत गोंधळ करत होती ती म्हणजे आपण मुळचे शेतकरी असल्याने शेतीशी व मुळ गावाशी नाळ कायम जुळवून राहावी ही इच्छा योग्य संधी साधुन आपल्या मुलांजवळ बोलुन दाखवली मुलांनी सुद्धा त्यांच्या इच्छेला प्रतिसाद देत योग्य वेळ व संधी पाहून शेती घेऊन वडीलांचे स्वप्न पूर्ण केलं आज रोजी पाचोरा शहरात नामांकीत प्रविण सोडा चे 2 शॉप व आपला जुना व्यवासाय पान टपरी व पेडकाई रेफ्रिजरेशन असे व्यवसाय हा परिवार करत आहे
पाचोरा पंचक्रोशीत शीत शवपेटी गरज आहे किंबहुना काही दात्यांनी शवपेटी लोकार्पण देखील केली आहे मात्र गरजुंची गरज समाप्त झाल्या नंतर काही ठिकाणी बेजबाबदार हाताळणीमुळे शितशवपेटीस सतत देखभाल करावी लागते त्याचा खर्च देखील त्याप्रमाणात असतोच या सर्व बाबी

लक्षात घेऊन पाचोरा शहरात सुप्रसिद्ध असलेल्या स्वतःच्या मालकीचे पेडकाई रेफ्रिजरेशन फर्म मध्ये वडीलांच्या वाढदिवसा निमित्त स्वतः शवपेटी तयार करून
दिनांक 15 रोजी श्री विश्वनाथ ( विष्णुआण्णा ) महादू पाटील (प्रविण सोडा व पेडकाई रेफ्रिजरेशन, पाचोरा )यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मूळ गावी तारखेडा बु ता पाचोरा येथे गावासह पंचक्रोशीसाठी शीत शव पेटी कै महादू तान्हा पाटील व कै शेवंताबाई महादू पाटील यांच्या स्मरणार्थ लोकार्पण करण्यात आली त्या प्रसंगी गावचे सरपंच विकास मुकुंदा पाटील , आर. आर पाटील,अरुण महाजन (कल्याण )दिनकर बागुल, राजू पाटील, शरद पाटील, प्रदीप चव्हाण, भिका बाविस्कर, सुरेश शन्कर अहिरे, बापू पाहिलवान, रविंद्र पाटील प्रविण पाटील व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते & त्याच दिवशी सकाळी विष्णुआण्णiच्या मुलांनी आपल्या सवंगडयासह कित्येक वर्षापासून अखंडित पणे सुर असलेले निराधार लोकांसाठी आधारवड येथे अन्नदान ही करण्यात आले
शेवटी विष्णुआण्णांना ध्येय न्युज परिवारा तर्फे वाढदिवसा निमीत्त हार्दिक शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here