दूषित पाणीपुरवठा होण्यास कारणीभूत गिरणा नदीतील अवैध्य वाळू उपसा थांबवा यासह इतर मागण्यांची पूर्तता करा

0

पाचोरा ( झुंज & ध्येय न्युज )भडगाव व शहर व तालुक्यातील गिरणा नदीपत्रात अवैद्य भरमसाठ वाळू उपसा होत आहे. नदीपात्रात वाळूच शिल्लक नसल्याने नैसर्गिक पाणी शुध्दीकरण होत नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होत असलेल्या विहिरीतून अत्यंत दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना डायरिया, संडास, उलट्या, पोटदुखी सारखे आरोग्यास प्राणघातक अशा आजारांशी सामना करावा लागत आहे. तसेच शहरात पावसामुळे रस्ता, गटारी, डबके स्वच्छता अभियान राबवावे. डेंग्यू, मलेरिया, हिवताप डास निर्मूलन फवारणी करावी. कॉलनी भागात कच्च्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा. त्याच बरोबर लाडकी बहीण योजना तात्पुरती न ठेवता ३१ ऑगस्ट ही मुदत काढून कायम स्वरुपी करावी. लाडका भाऊ योजना ३५ वर्ष वयोमर्यादा ऐवजी ४५ वर्ष करावी. या आशयाच्या विविध मागणीचे सयुंक्तिक निवेदन तहसीलदार विजय बनसोडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख दिपक पाटील, तालुका प्रमुख जे. के. पाटील, महिला उपजिल्हाप्रमुख पुष्पा परदेशी, माजी उपसरपंच उषा परदेशी, संघटक गायत्री बिरारी, चेतन पाटील, नरेंद्र पाटील, अमोल पाटील, नवल पाटील, अमोल पाटील, देवेंद्र धोबी आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here