पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु. भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिरात कार्यरत मुख्यध्यापक अशोक परदेशी 35 वर्षांची उत्तम सेवा पूर्ण करून दिनांक 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या सुखद प्रसंगी आणि त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी एक भव्य सत्कार समारंभ 1 जुन रोजी आयोजित करण्यात आला आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ ( मा आमदार& पा.ता. सह.शि. संस्थेचे अध्यक्ष)
तर प्रमुख अतिथी म्हणून
मा. श्री. नानासाहेब संजय ओंकार वाघ,( चेअरमन, पा.ता. सह. शि. संस्था )
मा. श्री. दादासाहेब अॅड. महेश एस. देशमुख, ( मानद सचिव, पा.ता.सह.शि.संस्था )
मा. श्री. नानासाहेब व्ही.टी. जोशी, (व्हाईस चेअरमन, पा.ता. सह.शि. संस्था )
मा. श्री. बापूसाहेब जगदीश पंडितराव सोनार, ( शालेय समिती चेअरमन ) राहणार आहे
मुख्याध्यापक अशोक परदेशी यांच्या 35 वर्षांच्या अखंड आणि समर्पित सेवेचा आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी, या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे आयोजन
श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यालय मंडळाची मुख्याध्यापिका आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.