Breaking

पाचोरा बसस्थानका बाबत सत्ताधारी सत्तेच्या मस्तीत तर विरोधक कुंभकर्णी झोपेत पाचोरा बसस्थानकाचा अमानुष कारभार प्रकरणी नम्र आवहान

पाचोरा ( झुंज & ध्येय न्युज ) बस स्थानक बाबतीत सतत एक ना अनेक प्रकार सामोरे येत आहेत नागरिकांना मिळणाऱ्या असुविधा याचा तर उच्चांक गाठला आहे तरी देखील पाचोरा येथील जनसेवेचा टेंभा मिरवणारे याप्रकरणी दखल घेण्यास तयार नाही


दिनांक 24 मे शुक्रवार रोजी सुमारे अकरा वाजता शिक्षणासाठी अपडाऊन करणाऱ्या ऋतिक मुकुंद जोशी राहणार बनोटी येथील युवक गाडीची वाट बघत बस स्थानकावर बसले असताना चक्क त्याच्या अंगावर फॅन पडला चेहऱ्यावर व डोक्यावर बऱ्यापैकी मार लागल्याने सदरचा युवक तब्बल 10 ते 15 मिनीटे बेशुद्ध अवस्थेत असताना त्याच्याजवळ बस स्थानकाचा कोणीही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी जवळ आला नाही काही प्रवासी सहकाऱ्यांनी सदरच्या युवकास उचल बेशुद्ध अवस्थेत जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये नेले
दुःखाची बाब म्हणजे सदरचा प्रकार बस स्थानकाच्या आवारात व बसस्थानकाच्या बेजबाबदार  पणामुळे घडलेला असताना त्याची दखल घेण्यासाठी कोणताही कर्मचाऱ्यांनी न येणे हे लक्षवेधी आहे
विशेष म्हणजे पाचोरा बस स्थानक संदर्भात आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी संदर्भात सत्ताधारी आणि विरोधक मात्र गप्प आहेत हे विशेष
ध्येय न्युजचे आवहान आहे सदरच्या मुलाच्या अंगावर फॅन पडलेला असताना घटनेचा कोणाजवळ फोटो किंवा VDO असतील तर कृपया त्वरित ध्येय न्यूज कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा Mo.7385108510 क्रमांकावर संपर्क साधावा

तसेच जे-जे पाचोरा एसटी डेपो व स्थानकात संदर्भात कोणत्याही प्रकारच्या तक्रारी तसेच रात्रीच्या वेळी बस स्थानक परिसरात शेवटची गाडी जाण्या येण्या आधी होणारी सामसुम या सह त्यांच्या भोंगळ कारभाराचे फोटो व VDO पुराव्यासह ध्येय न्यूज कडे सादर करावेत
मग बघु मस्तावलेले अधिकारी आणि त्यांना राजकीय आशिर्वाद देणारे गॉड फादर & कुंभकर्णी झोपेत असलेले सत्ताधारी सह विरोधक यांचा खरा चेहरा कसा जनते समोर आणला जातो वास्तविक निवडणुकीचे सिझन असल्याने जी सामान्यांचे प्रश्न घेऊन हीच वेळ आहे संघटन व चळवळ उभी करण्याची मात्र विरोधक फक्त निवडणुकी पुरता मर्यादित दिसत आहे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करायला तयार नाही या बाबत देखील जनतेने लक्षात घेणे महत्त्वाचे आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here