श्री.गो.से. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांची दहावीच्या परीक्षेत उत्तुंग भरारी तालुक्यात विद्यालयाला मिळाला प्रथम येण्याचा बहुमान

पाचोरा : तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित पाचोरा येथील श्री.गो.से. हायस्कुलमधील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान विद्यालयास प्राप्त झाला आहे. परीक्षेत शाळेचा ९८.१३ टक्के निकाल लागलेला आहे. १८९ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. निकालात प्रथम प्रणवी ललित पाटील ९७.६०, द्वितीय कोमल अनिल महाजन ९४.६०, तृतीय अंकिता मनोज पाटील ९४, चवथा प्राची मंगेश मिसाळ, विनायक समाधान पाटील ९३.८०, पाचवा

हितेश संजय वाकलकर ९३.२०, सहावा गुरुशरण जगदीश सोमवंशी ९३, हितेश चंद्रकांत पाटील ९३, सातवा रितेश | कांतीलाल मार्कड ९२.४०, आठवा सुदर्शनमनोज दुसाने ९१.६०, नववा साक्षी दीपक पाटील ९१.४०, दहावा सिद्धी महेश चिंचोले ९१.२० यांचा समावेश आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा मा आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजयनाना वाघ, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी. जोशी, मानद सचिव दादासाहेब अॅड. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन वासुदेवआण्णा महाजन, संस्थेचे संचालक
मंडळ, पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.पी.एम. वाघ, उपमुख्याध्यापक नरेंद्र आर. पाटील, पर्यवेक्षक आर.एल. पाटील, ए.बी. अहिरे, सौ.ए.आर. गोहिल, तांत्रिक विभाग प्रमुख एस.एन. पाटील, किमान कौशल्य प्रमुख एम. बी. बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. तडवी, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here