ऐनपूर महाविद्यालयात वाचन – प्रेरणा दिवस संपन्न

0

रावेर –  ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. वाचन – प्रेरणा दिवस हा डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
             डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म  एका सर्वसामान्य कुटुंबात झालेला असून त्यांचे वडील नावाडी म्हणून काम करत होते. अत्यंत गरिबी परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेऊन आपल्या देशाच्या संरक्षणासाठी मिसाईल तयार करण्याचे कार्य त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्णत्वास गेले. ते आपल्या देशाचे अकरावे राष्ट्रपती असून एक उत्कृष्ट अभियंता म्हणून त्यांनी देशाची सेवा केलेली आहे. असे प्रा. डॉ. रेखा प्रमोद पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
         या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नीता वाणी ह्या होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वभावात असलेले संघटन कौशल्य याविषयी माहिती दिली. सदर प्रसंगी प्रा. डॉ. एस बी पाटील, प्रा. एस. आर. इंगळे, प्रा. पी. एन. तायडे, प्रा. डॉ. व्ही. एन. रामटेके, प्रा. डॉ. डी. बी. पाटील, प्रा. एस. पी. उमरिवाड प्रा. डॉ. जे. पी. नेहेते हे उपस्थित होते. सदर उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
           सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. नरेंद्र मुळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. पी. एन. तायडे  यांनी मानले. सदर प्रसंगी प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here