मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा मुंबई-२ केंद्र ६ डिसेंबर रोजी सुरू होत आहे. ही स्पर्धा साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-२ केंद्रावर सुरू होत आहे. या स्पर्धेमध्ये विविध १७ नाट्य संस्थांनी सहभाग घेतला आहे. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.
*स्पर्धेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:*
शुक्र. ६ डिसें. सायं. ७ वा. शेवटचा पर्याय लेखक : आनंद म्हसवेकर दिग्दर्शक : श्रीकांत मोरे दि. मानवता असोसिएशन
शनि. ७ डिसें. स. ११:३० वा. साती साती पन्नास लेखक : संजय पवार दिग्दर्शक : श्रद्धा माळवदे शिवशाही कला क्रीडा सेवा केंद्र, मुंबई
शनि. ७ डिसें. सायं. ७ वा. हायब्रीड लेखक : नितीन सावळे दिग्दर्शक : केतन गायकवाड सह प्रमुख कामगार अधिकारी, शहर, बृहन्मुंबई म.न.पा.
रवि. ८ डिसें. सायं. ७ वा. पूर्णविराम लेखक : इरफान मुजावर दिग्दर्शक : जयेंद्र बगाडे सह प्रमुख कामगार अधिकारी, पश्चिम उपनगरे, बृहन्मुंबई म.न.पा.
सोम. ९ डिसें. स. ११:३० वा. वेडात म्हातारे वेघात दौडले तीन लेखक : प्रकाश गावडे दिग्दर्शक : प्रमोद तांबे सहकारी मनोरंजन मंडळ, मुंबई
सोम. ९ डिसें. सायं. ७ वा. कम आय मे गो आय मस्ट लेखक व दिग्दर्शक : डॉ. शिरीष ठाकूर एस. के. युनिटी इंडिया मल्टी सर्विसेस, मुंबई
मंगळ. १० डिसें. स. ११:३० वा. मोक्ष लेखक : महेंद्र कुरघोडे दिग्दर्शक : रमाकांत जाधव श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठान, मुंबई
मंगळ. १० डिसें. सायं. ७ वा. द इनर वर्ल्ड लेखक व दिग्दर्शक : अरुण गवळी ऋतुरंग थिएटर, मुंबई
बुध. ११ डिसें. स. ११:३० वा. १९६० रोजी लेखक व दिग्दर्शक : कुणाल तांबे रविंद्र कला आविष्कार संस्था, मुंबई
बुध. ११ डिसें. सायं. ७ वा. शोध सावल्यांचा लेखक व दिग्दर्शक : रितेश बायस राजे ट्रेकर्स, मुंबई
शुक्र. १३ डिसें. स. ११:३० वा. रेड अम्ब्रेला लेखक व दिग्दर्शक : अमित सोलंकी प्रमुख थिएटर असोसिएशन
शुक्र. १३ डिसें. सायं. ७ वा. शोकांतिकेची रात्र लेखक व दिग्दर्शक : राहुल कोंडे नवी मुंबई स्वयंसेवी समन्वय संस्था, वाशी
शनि. १४ डिसें. सायं. ७ वा. म्याडम लेखक : ऋषिकेश तुराई दिग्दर्शक : प्रणय आहेर नवदुर्गा मित्र मंडळ, चेंबूर
सोम. १६ डिसें. स. ११:३० वा. द हंग्री क्रो लेखक : डॉ. सोमनाथ सोनवलकर दिग्दर्शक : स्वप्नील खोत माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब, मुंबई
सोम. १६ डिसें. सायं. ७ वा. द फिलिंग पॅराडॉक्स लेखक व दिग्दर्शक : डॉ. सोमनाथ सोनवलकर माणूस फाऊंडेशन
मंगळ. १७ डिसें. सायं. ७ वा. नॉक आऊट लेखक : प्रसाद बाग दिग्दर्शक : किरण गावडे किंकणी कला अकादमी, मुंबई
बुध. १८ डिसें. स. ११:३० वा. जगज्जेता लेखक : श्रीनिवास नार्वेकर दिग्दर्शक : प्रवीण नाईक बेस्ट कला आणि क्रीडा मंडळ, मुंबई
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्यावतीने विकास खारगे (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच विभीषण चवरे संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीतजास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व नाट्य संस्थांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” https://www.rangabhoomi.com/tickets/63rd-haushi-marathi-rajya-natya-spardha/ ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.