पाचोरा शहरातील पुनगाव रोड भागातील नागरिक आणि विद्यार्थी सध्या चोरटी गौण खनिज वाहतूक झाल्यामुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. शहराच्या या महत्वपूर्ण भागांमध्ये रात्री उशिरा सुरू होणाऱ्या या वाहतुकीमुळे ना नागरिकांना झोप मिळते, ना विद्यार्थ्यांना अभ्यास करता येतो. सर्वसामान्यांसाठी हा विषय केवळ त्रासाचा मुद्दा नसून, प्रशासनाची जबाबदारी आणि त्यांच्यावरील विश्वास यावरही प्रश्न निर्माण करणारा आहे.
गौण खनिज वाहतुकीची समस्या
पाचोरा शहर आणि परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दहा टायरी डंपरद्वारे गौण खनिजाची वाहतूक होते. विशेषतः गोसे हायस्कूल मार्गे पुनगाव रोड या भागात हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. या मार्गावर राहणाऱ्या नागरिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. किंबहुना या मार्गावर रात्री गौणखणीजची किती मोठी चोरटी वाहतूक चालते याचे थेट CCTV फुटेज ध्येय अकॅडमीच्या दालनात उपलब्ध होऊ शकतात परंतु त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने नागरिकांच्या संतापाला उधाण आले आहे.
गौण खनिज वाहतुकीचा प्रश्न हा केवळ पाचोरा शहरापुरता मर्यादित नाही. हा विषय संपूर्ण देशभर , राज्यभरात गंभीर बनला आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीला महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याची चर्चा होत आहे. परिणामी, या वाहनांचा वेग, आवाज, आणि सदरची वाहने एवढी भरतात & वेगात असतात की त्यांच्यातून वाळू उधळून रात्रभर जणू काही रस्त्यावर वाळूची पेरणी केलेली असते परिणामतः महाविद्यालयात जाणारी मुले – मुली यांचे वाहन स्लिप होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येते यामुळे रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण वाढले आहे परिणामतः नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष आणि परिणाम
पाचोरा मे न्यायालयाजवळ माननीय न्यायाधीशांचे निवासस्थान आणि हाकेच्या अंतरावर डीवायएसपी साहेबांचे निवासस्थान आहे. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस कर्मचारी तेथे तैनात असतात. परंतु, प्रशासनाच्या लक्षाखालीही रात्रीच्या वेळेस चोरटी वाहतूक होत असल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून टीका होत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन यांचे आशीर्वाद असल्याशिवाय अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर चोरटी गौण खनीज वाहतूक होणे शक्य नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे.
अशा चोरट्या वाहतुकीचे दूरगामी परिणाम प्रशासनालाही भोगावे लागतात. या प्रकरणांत अनेक ठिकाणी काही दोषी व काही निर्दोष अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर हल्ले , मारहाण झाली तरी याची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत, याचा अंदाज येतो. “जसे कर्म तैसे फळ” या उक्तीप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांना – कर्मचाऱ्यांना देखील भविष्यात त्याचा फटका बसू शकतो यात शंका नाही
नागरिकांच्या मागण्या आणि अपेक्षा
गिरडरोड व पुनगाव रोड रहिवाशांनी प्रशासनाला वारंवार विनंती केली आहे की, चोरट्या वाहतुकीला रात्री प्रोत्साहन देण्याऐवजी थेट दिवसाच्या वेळेत खुल्या परवानगीसह वाहतूक सुरू ठेवावी. यामुळे रात्रीच्या वेळेस तरी किमान नागरिकांना शांत झोप मिळेल आणि विद्यार्थ्यांना अभ्यास करता येईल. किंवा या चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांना मार्ग बदलण्याची सक्त ताकीद द्यावी अशी विनंती केली जात आहे आता तरी प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कारवाई करावी, अशी रहिवाशांची अपेक्षा आहे.
प्रशासनाची भूमिका आणि उपाययोजना आवश्यक
गौण खनिज वाहतूक ही एक मोठी समस्या असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. आम्ही म्हणनार नाही ही चौरटी गौण खनिज वाहतूक बंद करा कारण सगळ्यांनाच पोट आहे & दरमहा वरपर्यंत पाकीटे पोहच करावी लागतात म्हणून देऊन – घेऊन का असेना मनसोक्तपणे गौण खनिज चोरटी वाहतूक सुरू राहू द्या अशी म्हणायची वेळ आता आली आहे पण किमान अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित तपासणी, वेळ & वेगमर्यादेचे पालन होणे आवश्यक आहे.
चोरट्या गौण वाहतुकीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी प्रशासनाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. केवळ तक्रारींच्या नोंदीवर समाधान मानण्या ऐवजी मानवतेच्या दृष्टीने आपण देखील समाजाचे काही देणे लागतो याची जाणीव ठेवून प्रत्यक्ष कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवणे आवश्यक आहे. जर खरोखर पोलीस व महसुल प्रशासनाने योग्य पावलेल्या उचलली, तर पाचोरा शहराच्या रहिवाशांना शांत झोप आणि विद्यार्थी भविष्याच्या अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळू शकेल यात शंका नाही






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.