भडगाव तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीची निवड: नरेंद्र पाटील अध्यक्ष, विठ्ठल पाटील सचिव

0

भडगाव : भडगाव तालुका पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीची निवड एकमताने व बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी नरेंद्र पाटील तर सचिवपदी विठ्ठल पाटील यांची निवड करण्यात आली. रविवारी, 8 डिसेंबर 2024 रोजी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या निवडीच्या वेळी भडगाव तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, सचिवपदी विठ्ठल पाटील, उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम महाजन व धनराज पाटील, सहसचिवपदी एस. डी. खेडकर, कार्याध्यक्षपदी जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुखपदी नितीन महाजन, कायदेशीर सल्लागारपदी भरत ठाकरे, तर ज्येष्ठ सल्लागारपदी परमेश्वर मोरे व सुरेश कोळी यांची निवड करण्यात आली. याशिवाय सदस्य म्हणून लिलाधर पाटील, भास्कर शार्दूल, आर. के. मिर्झा, व सुभाष ठाकरे यांची निवड झाली आहे.

भडगाव येथील स्थानिक शासकीय विश्रामगृहात आयोजित या बैठकीचे अध्यक्षस्थान जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी भूषवले. त्यांनीच कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. बैठकीत सुनिल पाटील, सोमनाथ पाटील, संजय पवार, सुनिल कासार, सागर महाजन, निंबाजी पाटील, राजू दीक्षित, असलम मिर्झा, राकेश पाटील, मनोज पाटील, बापूराव शार्दूल, रमेश धनगर, राजू शेख, परमेश्वर मोरे, सुरेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
     नवनिर्वाचित कार्यकारिणीचे गावागावांतून तसेच तालुक्यात विविध स्तरांवरून अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीनंतर भडगाव तालुका पत्रकार संघाच्या कामकाजाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे साप्ताहिक झुंज व ध्येय न्यूज परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here