पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा बु .येथील निसर्ग ऍग्रो एजन्सी या कृषी निविष्क्षा केंद्रातून विक्रीस असलेल्या रासायनिक खतांबाबत शेतकऱ्यांनी गंभीर स्वरूपाची तक्रार नोंदवली. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन पाचोरा येथील उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आर. एन. जाधव आणि तंत्र अधिकारी एस. व्ही. कनाड यांनी तक्रारदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदर खत विक्री केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान शेतकऱ्यांच्या तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या रासायनिक खतांचे दोन नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले.
तपासणी दरम्यान काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याने संबंधित विक्रेत्याला नोटीस बजावण्यात आली असून, सदर साठवण व विक्री केंद्रावर विक्रीबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, तपासणीमध्ये आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली नाही, तर परवान्यावर पुढील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय कृषी अधिकारी श्री. आर. एन. जाधव यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या समाधानासाठी कृषी विभाग सजग
शेतकऱ्यांकडून नोंदवण्यात आलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत कृषी विभागाने संबंधित विक्रेत्यावर कारवाई केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि गुणवत्तायुक्त कृषी निविष्क्षा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग सतर्क असल्याचे दिसून आले आहे.
संबंधित प्रकरणात तपासणी दरम्यान तक्रारीतील मुद्दे आणि विक्री केंद्राच्या व्यवस्थापनात आढळलेल्या त्रुटी याबाबत सविस्तर तपशील मिळवण्यासाठी कृषी विभागाने कार्यवाही सुरू ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे आणि परिणामकारक रासायनिक खते मिळावीत यासाठी कृषी विभागाकडून नियम व अटींचे काटेकोर पालन करण्यास प्राधान्य दिले जात आहे.
शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना
या कारवाईनंतर शेतकरी वर्गातून कृषी विभागाच्या तातडीच्या हस्तक्षेपाचे स्वागत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी कृषी विभागाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
संबंधित तपासणी आणि पुढील कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात येणाऱ्या अहवालाची प्रतीक्षा असताना कृषी विभागाने आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत शेतकऱ्यांच्या हितासाठी तत्पर राहावे, अशी भावना शेतकरी समुदायामध्ये व्यक्त केली जात आहे. या संदर्भात संबधित विक्रेत्याने स्पष्ट सांगितले माझ्या कृषी केंद्रावर सर्व राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त कंपन्यांचा & अधिकृत बिलींग मध्ये माल असतो तो देखील उत्तम दर्जाचा आहे कुठेही तपासणी केली तरी त्या चौकशी व तपासणीला केव्हाही जाण्यास तयार आहे कर नाही तर डर कशाला
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.