पाचोरा – शहरात आधुनिक दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज महाजन मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटल सुरू होत आहे. डॉ. पराग गोविंद महाजन यांच्या पुढाकाराने साकारलेले हे दवाखाने दंतचिकित्सेत नावीन्यपूर्ण सेवा पुरविण्यास सज्ज आहे. या हॉस्पिटलचा शुभारंभ रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
उद्घाटन सोहळा शुभारंभ शुभहस्ते:
डॉ. विश्वराज हनुमंतराव निकम (फलटण) – Oral & Maxillofacial Surgeon & Cosmetologist.
डॉ. इम्रान शेख (पुणे) – Gold Member, 3D Cleaning Project.
प्रमुख अतिथी: -मा. आप्पासो. किशोर धनसिंग पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव.
मा. भाऊसो. अमोल पंडीतराव शिंदे, भाजपा नेते.
मा. श्री. सचिन दादा सोमवंशी, तालुकाध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेस.
मा. भाऊसो. अनिल रामदास महाजन, माजी सभापती, पंचायत समिती डोल.
मा. श्री. दिलीप ऑकार वाघ, माजी आमदार.
मा. सौ. वैशाली नरेंद्र सूर्यवंशी, संचालिका, निर्मल सीड, पाचोरा.
मा. श्री. दादासो. प्रकाश बाजीराव पाटील, निवृत्त आयुक्त, विक्रीकर विभाग.
शुभारंभ सोहळ्याला स्थानिक डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम स्थळ: सावित्री नगर, एसएसएमएम महाविद्यालयाजवळ, भडगाव रोड, पाचोरा.
महाजन मल्टी स्पेशलिटी डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. पराग महाजन यांचा थोडक्यात परिचय
डॉ. पराग गोविंद महाजन हे अत्यंत कुशल आणि अनुभवी दंतचिकित्सक असून त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथील ग्रामविकास विद्यालयात झाले. नवोदय परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी भुसावळ नवोदय विद्यालयात शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी संगमनेर येथे त्यांनी B.D.S. (MUHS) अभ्यासक्रम पूर्ण केला आणि तज्ज्ञ म्हणून नाव कमावले.
दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी बाबत डॉक्टर पराग माझे यांनी काही खास टिप्स पुढील प्रमाणे नमूद केलेल्या आहेत
सुंदर आणि निरोगी दात हे आरोग्यदायी जीवनासाठी आवश्यक आहेत. यासाठी काही महत्त्वाच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे:
1. दिवसातून दोन वेळा ब्रश करा: सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करणे दातांसाठी आवश्यक आहे.
2. माऊथवॉशचा वापर करा: तोंडातील दुर्गंधी आणि जीवाणू नष्ट करण्यासाठी माऊथवॉश उपयोगी ठरतो.
3. जिभेची स्वच्छता: जिभेवर साचलेल्या जीवाणूंमुळे दुर्गंधी येते. त्यामुळे जिभेची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.
4. फ्लॉसचा वापर करा: दर आठवड्याला ३-४ वेळा फ्लॉसचा वापर केल्यास दातांमध्ये अडकलेले अन्नकण काढले जाऊ शकतात.
5. धूम्रपान व तंबाखूजन्य पदार्थ टाळा: या सवयींमुळे दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
6. पाणी व प्रथिनेयुक्त आहार: हिरड्यांच्या आरोग्यासाठी भरपूर पाणी प्या आणि पोषक आहार घ्या.
7. जेवणानंतर तोंड धुवा: अन्नकण तोंडात राहू नयेत म्हणून प्रत्येक जेवणानंतर चुळ भरून तोंड स्वच्छ करा.
8. डेंटिस्टकडे नियमित तपासणी करा: दर सहा महिन्यांनी दंतचिकित्सकांकडे तपासणी करणे गरजेचे आहे.
महाजन डेंटल हॉस्पिटलची वैशिष्ट्ये
महाजन मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार सेवा दिली जाईल. येथे दातांचे सर्व प्रकारचे उपचार आणि सल्लामसलत उपलब्ध आहे. स्थानिक रहिवाशांसाठी ही सुविधा दंतआरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल.
Mo. 90962 97065.
पत्ता: सावित्री नगर, एसएसएमएम महाविद्यालयाजवळ, भडगाव रोड, पाचोरा.
तरी नातेवाईक , स्नेही ,आप्तेष्ठ , हितचिंतकांसह या सर्व जनतेने या शुभारंभ सोहळ्याला हजेरी लावून
शुभेच्छापर आशिर्वाद द्यावे व वेळो वेळी रुग्णांनी आधुनिक आणि दर्जेदार दंतचिकित्सेचा अनुभव घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.