पाचोरा – पत्रकारिता क्षेत्रात सध्या अनेक प्रकार पाहायला मिळतात. प्रसार माध्यमांचा वाढता प्रभाव आणि डिजिटल युगामुळे स्वतःची पोर्टल किंवा यूट्यूब चॅनेल काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. अशा वेळी प्रत्येकजण स्वतःचे पत्रकारितेचे पद्धतशीर स्वरूप ठरवतो. यातून काही लोक समाजाच्या भल्यासाठी काम करतात, तर काहींनी पत्रकारितेला व्यावसायिक किंवा स्वार्थ साधण्याचे साधन बनवले आहे.
सद्यस्थितीत, विविध क्षेत्रांत नोकरभरती बंद असली तरी, पत्रकारितेच्या नावाखाली शिक्षण असो की नसो मराठी व्याकरण साधे काळाचे प्रकार माहित नसणे तो भाग जाऊ द्या
शुद्ध मराठी बोलता येत नसले तरी नवीन चेहऱ्यांचा समावेश सातत्याने होत आहे. निवडणूकांचा काळ असो किंवा सणासुदीचा हंगाम, पत्रकारांचा अचानक उगम होताना दिसतो. मात्र, या गर्दीत काही अपवादात्मक व्यक्तिमत्त्वे समाजाच्या भल्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकारितेचे कार्य करतात. अशाच अपवादांपैकी एक नाव आहे पाचोऱ्यातील Citizen Journalism अनिलआबा येवले.
अनिलआबा येवले हे एक साधे, सरळ, निर्व्यसनी आणि कष्टाळू व्यक्तिमत्त्व आहे, जे
Citizen Journalism अवलंब करून समाजाला सेवा देतात. त्यांच्या पत्रकारितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा आणि प्रामाणिकपणा. त्यांच्याकडे कोणताही कागद, पेन, बूम, पोर्टल, यूट्यूब चॅनेल किंवा व्हिडिओ कॅमेरा नाही. तसेच, त्यांना बसायला विशिष्ट जागेची अपेक्षा नाही किंवा कोणताही हट्ट नाही.
अनिलआबांनी आयुष्यात कधी कोणत्याच हॉटेलमध्ये स्वखर्चाने किंवा इतरांच्या पैशाने भोजन करताना त्यांना पहिल्याचा अनुभव नाही. त्यामुळे कोणाकडून एखादा पैसा, पाकीट, किंवा इतर स्वरूपातील मदत स्वीकारल्याचे उदाहरण नाही. त्यांची स्वाभिमानाने जगण्याची वृत्ती आणि स्वतःच्या कष्टावर भरवसा हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
अनिलआबांकडे स्वतःची गाडी नव्हे तर गाड्या घेण्याची आर्थिक क्षमता असूनही ते टू-व्हीलर गाडी चालवू शकत नाहीत. त्यामुळे ते नेहमी पायी चालत असतात आणि आपल्या
Citizen Journalism पत्रकारितेचा छंद जोपासण्यासाठी सतत अधिकाऱ्यांच्या व राजकीय व्यक्तीच्या संपर्कात राहतात.
अलीकडेच अनिलआबा शिरपूर येथे त्यांच्या मुलीच्या शैक्षणिक कामासाठी गेले होते. काम आटोपल्यावर, त्यांना आपल्या Citizen Journalism छंद जोपासायचा होता. त्यामुळे ते शासकीय कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी गेले. तहसील कार्यालयात असताना त्यांनी एका महिलेचा आवाज ऐकला. उत्सुकतेने डोकावून पाहिल्यावर त्यांना दिसले की, ती महिला दुसरी-तिसरी कोणी नसून खुद्द शिवसेनेच्या रणरागिणी उपनेत्या आणि पाचोरा तालुक्याची कन्या सौ. शुभांगीताई पाटील होत्या. त्या त्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जनतेच्या हिताच्या कामांसाठी झाडाझडती घेत होत्या.
शुभांगीताईंशी अनिलआबांची ओळख शिक्षक आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झाली होती. त्या ओळखीवर अनिलआबांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधला आणि नेहमीप्रमाणे आपल्या
Citizen Journalism छंद जोपासण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करत राहीले
अनिलआबा यांची पत्रकारिता कोणत्याही व्यावसायिक व लाचारीच्या हेतूंपेक्षा समाजाभिमुख आहे. त्यांनी कधीच आपले कार्य आर्थिक फायद्यासाठी वापरले नाही. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच अधिकारी आणि लोकांमध्ये त्यांना मान मिळतो.
अनिलआबा यांसारखे पत्रकार समाजातील दुर्लक्षित कोपऱ्यांतील प्रश्नांवर प्रकाश टाकतात. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना मदत मिळते. अशा साध्या, सरळ, आणि खंबीर व्यक्तिमत्त्वाचा आमचा मित्र असणे ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे.
अनिलआबा येवले यांच्यासारखी व्यक्तिमत्त्वे समाजात दुर्मिळ आहेत. त्यांनी पत्रकारितेला एक सामाजिक सेवा म्हणून स्वीकारले आहे. त्यांच्या साधेपणातच त्यांचे महानत्व आहे, अनेकांना Citizen Journalism समजणार नाही परंतु त्या माध्यमातून त्यांनी समाजातील प्रश्नांना आवाज दिला आहे. त्यांच्या कार्यातून समाजासाठी आदर्श घेण्यासारखे भरपूर आहे.
….✍️ संदीप महाजन 73 8510 8510
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.