पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये भक्तिमय वातावरणात दत्त जयंती उत्सव साजरा

0

पाचोरा पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील चिमुकल्या दत्त मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय कोणताही पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा नागरिक आपले कार्य सुरू करत नाही, ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंडित चालू आहे. या मंदिराने केवळ धार्मिक महत्त्वच जपलेले नाही, तर सर्वधर्मीय एकतेचा संदेशही दिला आहे. दत्त जयंतीच्या निमित्ताने पाचोरा पोलीस स्टेशनने यंदाही उत्साहात आणि भक्तिभावाने हा सोहळा साजरा केला.दत्त जयंतीचे विशेष आयोजन
पी. आय. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाच्या दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी महसूल विभाग, न्यायालय, होमगार्ड, पोलीस अधिकारी-कर्मचारी तसेच पत्रकार परिवार यांना निमंत्रित करण्यात आले. यावर्षीचा विशेष आकर्षण म्हणजे ह.भ.प. योगेश महाराज धामणगावकर संचलित लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग.कार्यक्रमात ह.भ.प. योगेश महाराज आणि पाचोरा पोलीस विभागाचे ए.एस.आय. निवृत्ती मोरे यांनी धार्मिक कीर्तन सादर केले. त्यांच्या कीर्तनातून “सारे जहां से अच्छा हिंदू सता हमारा” आणि सर्वधर्मीय ऐक्याचा संदेश देण्यात आला. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाला उपस्थितांकडून भरभरून दाद मिळाली.

सामाजिक सलोख्याची जपणूक
दत्त जयंती निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण होऊन सामाजिक सलोखा वृद्धिंगत झाल्याचे या सोहळ्यात दिसून आले. विशेषतः महाप्रसादाच्या वितरणात लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर इतर नागरिक व पोलीस अधिकारी-कर्मचारी यांना सन्मानाने महाप्रसादासाठी आमंत्रित करण्यात आले.

पी. आय. अशोक पवार यांची अनुकरणीय कार्यशैली
पी. आय. अशोक पवार यांची कार्यशैली या सोहळ्याचा केंद्रबिंदू ठरली. जणू काही ते कार्यक्रमाचे आयोजक नसून कुटुंबप्रमुख असल्याचा भाव निर्माण झाला. त्यांनी प्रत्येक उपस्थित व्यक्तीचे स्वागत करत कार्यक्रमाची सूत्रे समर्थपणे हाताळली. एवढेच नव्हे, तर वर्दळीतही पोलीस स्टेशनचे नियमित कामकाज प्रांगणातच एकाग्रतेने पूर्ण करत असलेल्या पवार साहेबांचे कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.एकात्मतेचा संदेश
पाचोरा पोलीस स्टेशनच्या वतीने साजऱ्या झालेल्या या दत्त जयंती सोहळ्याने केवळ धार्मिक भावना वाढवल्या नाहीत, तर सर्वधर्मीय एकतेचा संदेशही दिला. पोलीस प्रशासनाचे समाजाशी असलेले दृढ नाते आणि सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न, हा कार्यक्रम यशस्वी ठरवणारा ठरला. पाचोरा पोलीस स्टेशनने एकत्रितपणे केलेला हा उपक्रम इतर पोलीस प्रशासनासाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here