पाचोरा उपविभागात गौण खनिज चोरीवर मोठी कारवाई – 7 ट्रॅक्टर जप्त

0

पाचोरा – प्रांत अधिकारी भुषण आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा उपविभागात महसूल विभागाच्या पथकाने गौण खनिज चोरी विरोधात मोठी मोहीम राबवून एकाच वेळी 7 ट्रॅक्टर जप्त केले आहेत. ही कारवाई पाचोरा प्रांत अधिकारी भूषण अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. या मोहिमेत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर छापे मारून संबंधित वाहनांना ताब्यात घेण्यात आले.                                 घोडदे येथून सुरूवात – 2 ट्रॅक्टर जप्त
घोडदे गावातून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पथकाने पकडले. या वाहनांना आयटीआय येथे जमा करण्यात आले. कारवाईसाठी भरत पाटील (मंडळ अधिकारी, कोळगाव), ग्राम महसूल अधिकारी शुभम चोपडा, योगेश पाटील, संजय सोनवणे, समाधान हुलुहुले, पाशा हलकारे, महसूल सहाय्यक महादु कोळी, महसूल सेवक किरण मोरे व समाधान माळी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
परधाडे गावात मोठी कारवाई – 4 ट्रॅक्टर जप्त .मौजे परधाडे येथेही अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 4 ट्रॅक्टरवर छापे मारण्यात आले. त्यापैकी 2 ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले, तर उर्वरित दोन ट्रॅक्टर पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या मोहिमेत विनोद कुमावत (निवासी नायब तहसीलदार, पाचोरा), आर. डी. पाटील (मंडळ अधिकारी, पाचोरा) तसेच अतुल पाटील, निखिल बळी, अमोल शिंदे, आदित्य सुरनर, अजमलशा मकानदार, तेजस भराटे, प्रदीप काळे व वाहनचालक विश्वेश यांनी विशेष मेहनत घेतली.
कराब येथील कारवाई – 1 ट्रॅक्टर जप्त
-मौजे कराब येथून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे 1 ट्रॅक्टर पकडण्यात आले. हे वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहे. या कारवाईत मंडळ अधिकारी भरत पाटील (कोळगाव), ग्राम महसूल अधिकारी समाधान हुलुहुले, योगेश पाटील, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महसूल सहाय्यक महादू कोळी व लोकेश वाघ यांनी सहभाग घेतला.
गिरड येथे तीन ट्रॅक्टर पकडले
-गिरड गावातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर पकडण्यात आले. या कारवाईचे नेतृत्व तहसीलदार शीतल सोलट मॅडम यांनी केले. या मोहिमेत सुधीर सोनवणे, समाधान हुलुहुले, योगेश पाटील, अभिमन्यू वारे, शुभम चोपडा, प्रशांत कुंभारे, महादू कोळी व लोकेश वाघ यांनी सहकार्य केले.
महसूल विभागाची कडक भूमिका
-महसूल विभागाने या कारवायांमध्ये कौशल्यपूर्ण नियोजन व समन्वय साधून गौण खनिज चोरीवर अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. या मोहिमेने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर संदेश दिला आहे.
प्रांत अधिकारी भूषण अहिरे पाचोरा – भडगाव येथील दोघंही तहसील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे काम करत मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज वाहतुकीवर नियंत्रण मिळवले आहे.
महसूल विभागाच्या या कारवाईने पाचोरा तालुक्यात अवैध खनिज चोरी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. प्रशासनाने यापुढेही अशा प्रकारच्या कडक कारवायांचा इशारा दिला आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here