विनामूल्य आधार कार्ड अद्ययावत करण्याची तारीख वाढवली

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युआयडीएआयने आधार धारकांना दिलासा देत विनामूल्य ऑनलाइन आधार कार्ड अद्ययावत करण्याची तारीख वाढवली आहे. आता १४ जून २०२५ पर्यंत आधार कार्ड अद्ययावत करू शकता. सदर सेवा फक्त मायआधार पोर्टलवर उपलब्ध आहे. यापूर्वी, आधार अद्ययावत करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२४ ठेवण्यात आली होती, जी नंतर १४ सप्टेंबर, नंतर १४ डिसेंबर २०२४ आणि आता १४ जून २०२५ करण्यात आली आहे.

“युआयडीएआयने १४ जून २०२५ पर्यंत मोफत ऑनलाइन दस्तऐवज अपलोड करण्याची सुविधा वाढवली आहे, ज्यामुळे लाखो आधार धारकांना फायदा होईल. युआयडीएआय लोकांना त्यांचे आधार दस्तऐवज अद्ययावत करण्यासाठी प्रोत्साहित करते,” असे युआयडीएआयने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

तुम्हाला तुमच्या आधारमध्ये कोणतीही माहिती अद्ययावत करायची असेल, तर ती घरबसल्या ऑनलाइन करता येईल.

१) अधिकृत युआयडीएआय वेबसाइट (MyAadhaar पोर्टल) ला भेट द्या.

२) तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी (OTP) प्रविष्ट करा.

३) दस्तऐवज अद्यतन विभागात जा.

४) ड्रॉपडाउन मेनूमधून दस्तऐवजाचा प्रकार निवडा आणि आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.

५) तुमच्या आधार अपडेटची स्थिती जाणून घेण्यासाठी सेवा विनंती क्रमांक सुरक्षित ठेवा.

बायोमेट्रिक अपडेटसाठी ऑफलाइन प्रक्रिया

तुम्हाला तुमचे बायोमेट्रिक्स (जसे की फिंगरप्रिंट, बुबुळ स्कॅन किंवा फोटो) अद्ययावत करायचे असल्यास, तुम्हाला जवळच्या आधार सेवा केंद्र किंवा नावनोंदणी केंद्राला भेट द्यावी लागेल. 

१) यासाठी सर्व प्रथम युआयडीएआय वेबसाइटवरून फॉर्म डाउनलोड करा.

२) आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म पूर्णपणे भरा आणि जवळच्या केंद्रावर जमा करा.

३) बायोमेट्रिक पडताळणी: पडताळणीसाठी तुमचा बायोमेट्रिक डेटा (फिंगरप्रिंट, आयरीस स्कॅन इ.) सबमिट करा.

४) तुम्हाला एक स्लिप दिली जाईल, ज्यामध्ये तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. याद्वारे तुम्ही तुमच्या अपडेटचे स्टेटस ट्रॅक करू शकता.

युआयडीएआय कागदपत्रे का अपडेट करत आहे?
युआयडीएआय आधार धारकांना वेळोवेळी त्यांचे दस्तऐवज अद्यतनित करण्यास प्रवृत्त करत आहे जेणेकरून त्यांची माहिती योग्य आणि वैध राहील. यामुळे सरकारी योजना आणि सेवांचा लाभ घेता येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here