गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंगबॉल स्पर्धेत सोलापूर संघ अजिंक्य

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी गं. द. आंबेकर यांच्या ६० व्या पुण्यस्मृती प्रित्यर्थ संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने ना. म. जोशी मार्ग, श्रमिक जिमखाना येथे रविवारी पूर्ण दिवस खेळविण्यात आलेल्या स्पर्धेत, कावेरी‌ नगर वि. सोलापूर जि. युथ फाऊंडेशन मनोराजुरी संघ २१ × १० अशी एकतर्फी लढत‌ होऊन, सोलापूर जि. युथ फेडरेशन संघ अजिंक्य ठरला.
  
सामान्यात उपविजयी कावेरी नगर, पुणे हा संघ ठरला. विजयी संघाला आंबेकर चषक-११ हजार रुपये रोख आणि उपविजयी संघाला आंबेकर चषक-८ हजार रुपये रोख पारितोषिके, उपांत्य पराभूत संघाना प्रत्येकी ५ हजार रोख व चषक देऊन  सरचिटणीस गोविंदराव मोहिते, खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनिल बोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. सामन्याचे उदघाटन शुटिंगबॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत आणि युनियन उपाध्यक्ष माजी नगरसेवक सुनिल अहिर यांच्या हस्ते पार पडले. उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे, साई निकम, कार्यालयीन अधिक्षक मधु घाडी आदी त्या वेळी उपस्थित होते.
  
उपांत्यपूर्व लढती अशा‌ झाल्या:- (१) कावेरी वि. शासकीय दूध डेअरी २१/१९, (२) संजय भोसले प्रतिष्ठान वि. सेल्यूट पुणे २१/१९, (३) सोलापूर जि. वि. सातारा जि. २१/१८, (४) खानापूर वि. मालेगाव २१/१२.
उपांत्य लढती:- (१) कावेरी वि. संजय भोसले प्रतिष्ठान २१/११, (२) सोलापूर जि. वि. खानापूर जि.२१/१५ अशा झाल्या.
  
शुटिंगबॉल सामान्यत प्रथम सोलापूर, द्वितीय कावेरी, तृतीय क्रमांक खानापूर संघ,चौथा क्रमांक संजय भोसले प्रतिष्ठान.सर्व‌ विजेत्या संघांना आंबेकर चषकासह रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
 
उत्कृष्ट शुटर दस्तगीर (कावेरीनगर पुणे), सामनावीर जयंत खंडागळे (सोलापूर जिल्हा.) यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.
  
स्पर्धेय एकूण २६ बलाढ्य संघ‌ खेळले‌. २१ गुणांचा एक सामना घेण्यात येऊन‌, सामने बाद पध्दतीने खेळविण्यात आले. शुटिंगबॉल सामने यशस्वी करण्यासाठी मुंबई शुटिंगबॉल असोसिएशनचे सरचिटणीस दीपक सावंत, सामना प्रमुख अशोक चव्हाण, कार्याध्यक्ष जालंदर चकोर, स्पर्धा निरीक्षक खजिनदार प्रफुल्लकांत वाईरकर, निरीक्षक तथा सहसचिव मिलिंद बिर्जे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग सुतार इत्यादी मान्यवरांचे श्रम लक्षणीय ठरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here