आज दि 21 आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल & ज्यु. कॉलेजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन

0

जळगाव: मागील १९ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेज, जळगावतर्फे वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५ चा भव्य सोहळा शनिवार, दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
    कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. नामदार श्री. गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. याप्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत शाळेच्या विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांचे दर्शन घडणार आहे. शाळेच्या यशस्वी वाटचालीला विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. नामदार श्री. गिरीषभाऊ महाजन (कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) भूषवणार आहेत. प्रमुख उपस्थितीत मा. श्री. राजुमामा भोळे (आमदार, जळगाव शहर), मा. श्री. आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव), आणि मा. श्री. ज्ञानेश्वर ढेरे (आयुक्त तथा प्रशासक, जळगाव शहर महानगरपालिका) यांचा समावेश आहे.
    तसेच सरस्वती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव सिताराम पाटील, जळगाव लोकसभेच्या खासदार मा. श्रीमती स्मिताताई वाघ, पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी, आणि ए.आ.वि. प्रकल्प यावलचे प्रकल्प अधिकारी मा. श्री. अरुण पवार हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
    स्नेहसंमेलनात शाळेच्या विद्यार्थ्यांना आपल्या सांस्कृतिक व कलेच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळणार आहे. नृत्य, गायन, नाट्य व इतर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला नवा वाव देणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गुण हेरून त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्याचा शाळेचा उद्देश आहे.
   हा भव्य सोहळा योगा सेंटर व शेतकी शाळेच्या समोर, चंदुअण्णा स्टॉपजवळ, खोटे नगर, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
   शाळेचे प्राचार्य, सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद यांनी एकत्रितपणे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले आहेत. या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालण्यासाठी पालक व मान्यवरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. चंद्रशेखर शिवाजीराव पाटील (नगरसेवक, प्रभाग क्र. ८) यांनी केले आहे.
आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेजचा वारसा
महाराष्ट्र शासन मान्यता व आर.टी.ई. प्रमाणपत्रप्राप्त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल अॅन्ड ज्यु. कॉलेज मागील १९ वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा वारसा पुढे नेत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करताना शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रमांची आखणी करते.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या या उत्सवात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here