प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाड:मय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याचे आवाहन

0

मराठी भाषेच्या उन्नतीसाठी अतुलनीय योगदान देणारे साहित्यिक, समीक्षक, मार्गदर्शक आणि प्राचार्य डॉ. किसनराव पाटील (जळगाव) यांच्या स्मरणार्थ, महाराष्ट्र साहित्य परिषद व किसनराव पाटील ज्ञानपरंपरा यांच्या संयुक्त विद्यमाने “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाड:मय पुरस्कार” आणि “प्राचार्य डॉ. किसनराव पाटील खानदेशस्तरीय वाड:मय पुरस्कार” प्रदान केले जातात.                    राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये अकरा हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ यांचा समावेश आहे, तर खानदेशस्तरीय पुरस्कारासाठी पाच हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानपत्र आणि शाल-श्रीफळ देण्यात येते.                     सन 2021 पासून या पुरस्कारांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. विविध वाड:मय प्रकारांसाठी निवड झालेल्या मान्यवर लेखकांना हे पुरस्कार देण्यात आले आहेत. 2021 साली कथा साहित्य प्रकारासाठी मनोहर सोनवणे (पुणे) आणि युवराज पवार (शिरपूर) यांना सन्मानित करण्यात आले. 2022 साली कविता साहित्य प्रकारासाठी पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार) आणि ऊषा हिंगोणकर (जळगाव) यांना गौरविण्यात आले. 2023 साली कादंबरी साहित्य प्रकारासाठी ज्ञानेश्वर जाधवर (पुणे) आणि विलास मोरे (एरंडोल) यांना पुरस्कार देण्यात आले. 2024 साली बालसाहित्य प्रकारासाठी वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असनारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव) आणि सौ. नीता शेंडे (पाचोरा) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे.                                         सन 2025 साठी हे दोन्ही पुरस्कार समीक्षा साहित्य प्रकारासाठी दिले जाणार आहेत. यासाठी इच्छुक लेखकांनी आपले समीक्षात्मक साहित्य पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्यावर आधारित प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.                      प्रत्येक प्रवेशिकेसाठी प्रकाशित समीक्षात्मक ग्रंथाच्या दोन प्रती, लेखकाचा फोटो आणि सविस्तर परिचय जोडणे अनिवार्य आहे. इच्छुकांनी आपले प्रस्ताव पुढील पत्त्यावर पाठवावेत: प्रा. डॉ. वासुदेव वले, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पाचोरा, तलाठी कॉलनी, पाचोरा, जि. जळगाव – 424201. अधिक माहितीसाठी 9420788336 या क्रमांकावर संपर्क साधावा.                                         प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेच्या वतीने डॉ. अशोक कौतिक कोळी (मो. 9421568427) यांनी या पुरस्कारासाठी आवाहन केले आहे. इच्छुकांनी वेळेत प्रवेशिका सादर करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत लेखकांसाठी ही एक मोठी संधी असून, प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि साहित्यिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here